सोलापूर जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 24 हजार 910 घरकुले पूर्ण

0
163

सोलापूर जिल्ह्यात राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सन 2016-17 ते सन 2020-21 मध्ये 12 हजार 552 घरकुले पूर्ण

सोलापूर : महाआवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अपूर्ण घरकूलांची कामे पूर्ण करावीत आणि मंजूर घरकूलांची कामे त्वरीत सुरू करावीत, अशा सूचना पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल रामोड यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयातून महाआवास अभियानाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेस उपायुक्त विजय मुळीक, राज्य कक्षाचे उपसंचालक नितीन काळे, सहायक आयुक्त डॉ.सीमा जगताप आदी उपस्थित होते.

डॉ.रामोड म्हणाले, गरजूंना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी 20 नोव्हेंबरपासून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांच्या कामांना गती देण्यासाठी आणि क्षेत्रीय यंत्रणांच्या समस्या दूर करण्यासाठी अभियानाबाबत कार्यशाळेचे विविध स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत लाभार्थ्यांना घरकूल बांधण्यास जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. ग्रामसभा घेऊन प्रतिक्षा यादी त्वरीत अंतिम करावी, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा स्तरावरदेखील ‘डेमो हाऊस’ बांधण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पुणे विभागाने चांगली कामगिरी केल्याचे सांगून दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा डॉ.रामोड यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात मुळीक यांनी सादरीकरणाद्वारे अभियानातील विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियान राबविताना मनरेगा आणि घरकूल योजना कक्षाचा परस्पर समन्वय ठेवून अभियानाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी काळे यांनीदेखील अभियानाच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेस दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागातील पाचही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचा प्रगती अहवाल

      जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2016-17 ते 20-21 अखेरपर्यंत 50 हजार 72 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले होते त्याअनुषंगाने 36 हजार 455 लाभार्थींना मंजुरी देण्यात आलेली आहे. तर 7 हजार 558 लाभार्थींना जागा उपलब्ध नाही तर 1020 लाभार्थ्यांना विविध योजनांमधून जागेचा लाभ देण्यात आला आहे तसेच 1001 लाभार्थींचे तात्पुरते स्थलांतरित झालेले असून 6 हजार 78 लाभार्थ्यांना कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतून कमी करण्यात आलेले आहे.

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घडला पाहिजे 35 हजार 567 घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून उर्वरित 890 लाभार्थ्यांना हप्ता वितरीत करावयाची प्रक्रिया सुरू असून यापैकी 24 हजार 910 घरकुले पूर्ण झालेली आहेत.

 राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण सन 2016-17 ते सन 2020-21 अखेरपर्यंत 15 हजार 279 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. या मंजूर लाभार्थीच्या पैकी 14 हजार 916 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला असून आज पर्यंत 12 हजार 552 घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत.

 राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना ग्रामीण सन 2016-17 ते 20 21 अखेरपर्यंत 14 हजार 497 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर लाभार्थीच्या पैकी 14 हजार 149 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून यासाठी 11 हजार 836 घरकुल पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन 2016-17 ते 20218-19 अखेर 580 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून यापैकी 568 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित झाला असून त्यातील 528 घरकुले पूर्ण झालेली आहेत.

राज्य पुरस्कार पारधी आवास योजना ग्रामीण सन 2016-17 ते 18-19 अखेर 202 घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर लाभार्थी पैकी 201 लाभार्थ्यांना पहिला मंजूर करण्यात आला असून त्यातील 188 घरकुले पूर्ण झालेली आहेत. महा आवास अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस मंजूर करण्यात आलेला असून त्यातील दहा हाऊसचे काम सुरू झालेले आहे व त्यातील 8 डेमो हौस पूर्ण झाले आहेत. आवास प्लस जॉब कार्ड मॅपिंग मध्ये 1 लाख 63 हजार 944 जॉब कार्ड चे मॅपिंग करण्यात आले आहे.

  महा आवास अभियानाच्या विभागीय कार्यशाळेस व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प संचालक श्री. कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते.