सोलापूर ; येथील सुप्रसिद्ध अशा चौडेश्वरी मंदिरात तोगटवीर क्षत्रिय समाजातील महिला भगिनींनी श्रावण शुद्ध षष्ठी देवी प्रतिष्ठापना निमित्त श्री चौडेश्वरी देवीला आपल्या सुवर्णकलशाने देवीच्या पादुकावर जलाभिषेक कम करण्यात आला.
कन्ना चौक येथील सुप्रसिद्ध अशा चौडेश्वरी मंदिरात जलाभिषेक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम, उपाध्यक्ष युवराज चिंता, सेक्रेटरी अनिल कंदी, सहसेक्रेटरी हिरालाल एरफुल व खजिनदार अरुण भीमरथी आदी उपस्थित होते.
हा जलाभिषेक कार्यक्रम गेले सात वर्षापासून सुरू असून यात महिला मंडळाच्या महिला भगिनी मोठ्या हिरोनीने भाग घेतात आणि हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पडतात असे समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम यांनी सांगितले.
सदरहू कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तो गटवीर महिला मंडळ सक्रिय होते अध्यक्ष सरस्वती सोमनाथ, उपाध्यक्ष सुनीता बडगंची, सेक्रेटरी चौडेश्र्वरी, सहसेक्रेटरी उमा बद्दल, खजिनदार छाया उदगिरी यांनी काम पाहिले.
या सहस्त्रजलाभिषेकं निमित्त महिला भगिनींना महिला मंडळाच्या वतीने ओटी भरणा करण्यात आली यामध्ये ब्लाऊज पीस, एक फळ, आणि तांदूळ, हळद-कुंकू असे देण्यात आले. महिला मंडळाचे अध्यक्ष सरस्वती सोमनाथ यांनी सर्व महिला भगिनींचे व समाज पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
हा जलाभिषेक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तोगटवीर क्षत्रीय समाज, तोगटवीर युवक संघ, तोगटवीर पतपेढी, तोगटवीर रुग्णालयाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास तोगटवीर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.