मानांकित खेळाडूंची विजयी सलामी
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने ‘स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे’ यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या १९ व १३ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापुर शहरासह पंढरपुर, मंगळवेढा, बार्शी, माळशिरस, अक्कलकोट, माढा आदी गावातील १९१ खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन सोलापुर डिस्ट्रिक्ट लॉंन टेनिस असोसिएशनचे चेअरमन राजीव देसाई डॉ. सौ.राधिकाताई चिलका मा. नगरसेवक प्रथमेश दादा कोठेयांच्या प्रमूख उपस्थित तर डॉक्टर राधिका ताई चिलका व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शोभा कुलकर्णी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाले. यावेळी आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, स्कूलचे सहशिक्षक सदानंद दिकोंडा, विद्या माने, दीपाली गलगली, श्रेया अकमंची, राखी शुक्ला, रोहिणी सुरवसे, होंनकळस, पवार, रुपश्री पाटिल यांच्या प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अतुल सोनके, राजू दसाडे, अशितोष जाधव, महेश गाडे, श्याम आडकी व सर्व शिक्षक वृंद परिश्रम घेत आहेत. सूत्र संचलन दीपाली निराली यांनी केले.
तर स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे, रोहिणी तुम्मा, प्रशांत पिसे, यश इंगळे आदी काम पाहत आहेत.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. राजीव देसाई यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व उपस्थित पालक व खेळाडूंना विषद करत खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी मानसिक, शारीरिक व बौद्धिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच खेळाडूंनी हार व जीतचा विचार न करता जिद्द व चिकाटीने खेळणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
सुशील रसिक सभागृह येथे रंगलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अग्रमानांकित व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस गायकवाड, सोहम शेटे, ओम चीनगुंडे, साईराज घोडके, सानवी गोरे, सृष्टी गायकवाड व आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे यांनी विजयी सलामी दिली. तर ११ वर्षाखालील गटात मानांकित वेदांत मुसळे, श्रेयस कुदळे, सृष्टी मुसळे, मनस्वी शिरसागर, संस्कृती जाधव व ७ वर्षाखालील गटात नमन रंगरेज घाणेगावकर, स्वरा निरंजन यांनी आकर्षक विजय मिळवीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा कोठे, डॉ. राधिका ताई चिलका, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, मा. देवेंद दादा कोठे, मा. प्रथमेश दादा कोठे ,प्राध्यापक विलास बेत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना मा. नगरसेवक प्रथमेश दादा कोठे व सोलापुर डिस्ट्रिक्ट लॉंग टेनिस असोसिएशनचे चेअरमन राजीव देसाई तसेच डॉ. राधिकाताई चिलका व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शोभा कुलकर्णी.
डावीकडून संतोष पाटील, अतुल कुलकर्णी, सहशिक्षक सदानंद दिकोंडा, उदय वगरे आदी शिक्षक वृंद.