कै. आप्पासाहेब वारद आणि महाराणा प्रताप पुण्यतिथी दिनानिमित्त मनपातर्फे पुतळ्यास अभिवादन

0
20

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कै. पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त इंद्रभवन येतील कै. पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास मा.आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कौन्सिल हॉल येतील आयुक्त यांच्या कार्यालयात महाराणा प्रतापसिंह व कै. पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या प्रतिमेस महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू इरेश स्वामी, विभागीय अधिकारी व्यंकटेश चौबे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकरी श्रीमती कस्तुराबाई चौगुले, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, महेंद्र वारद,नागनाथ लिगाडे,राजेंद्र मायनाळे उमेश सिदगी, मल्लेश कावळे,मल्लिनाथ पाटील,शोभा बोल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.