शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरात भरणार भव्य रोजगार मेळावा

0
70
  • सोलापूर: शरद पवार यांच्या वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रमध्येच नव्हे तर देशात अनेक उपक्रम राबवून साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने देखील शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून १२ डिसेंबर पासून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा वांगी रोड, राजस्व नगर शेजारी, सुभद्राबाई मंगल कार्यालय, विजापूर रोड, न्यू आर. टी.ओ. ऑफीसच्या जवळ घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात डॉक्टर्स, इंजिनिअर्स, MBA, Executive Officers अशा अनेक उच्च शिक्षित पदे व त्याचबरोबर अक्कलकोट MIDC, होटगी रोड, MIDC चिंचोळी तसेच शहरातील सर्व Show room, मोठे हॉस्पीटल, तसेच हॉटेल व पुणे MIDC, IT Sector Park, बारामती MIDC, करकंब MIDC, टेंभूर्णी MIDC व विविध उद्योग क्षेत्रातील अनेक मोठ्या उद्योग मध्ये सगळ्या विभागातील पदविधर (ग्रॅज्युएट) ITI मधील कोर्सेस, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल, CNC, VMC ऑपरेटर, डॉफ्टसमन मेकॅनिकल, डिप्लोमा, डिग्री सिव्हील इंजिनिअर होल्डर Hospital Nurses, GNM, ANM तसेच सफाई कामगार फरशी, झाडू मारण्यासाठी मावशी, पेशंटची व्यवस्था करण्यासाठी मावशी अशा अनेक एकूण २००० पोस्ट आहेत.
  • सध्या सगळीकडे सुशिक्षित बेरोजगाराची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सोलापूर शहरात व जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळावा त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून महिला आघाडीच्या वतीने हा उपक्रम घेण्यात येत आहे.
  • सोलापूर शहर जिल्ह्यातून जे बेरोजगार युवक युवती, तसेच गरजू लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील किंवा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
  • हा कार्यक्रम बुधवार २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजल्या पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुभद्राबाई मंगल कार्यालय येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा निरीक्षक शेखर माने, आ. राजन पाटील साहेब, सोलापूर शहर अध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, महेश कोठे, सपाटे साहेब, गादेकर साहेब, तौफिक शेख, प्रमोद गायकवाड, जुबेर बागवान तसेच शहरातील सर्व नेते व कार्यकर्ते तसेच शहरातील पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष युवक युवती व विद्यार्थी सेलचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नलीनी चंदले, सुनिता गायकवाड, सिया मुलांची, कविता पाटील, लता गेले, सुनिता रोटे, यांनी पत्रकार परिषदेची माहिती दिली.