• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पै. सिंकदरच्या कथित विवादास्पद निकालावर पै. अस्लम काझी यांनी टीकाकारांचे टोचले कान

Yes News Marathi by Yes News Marathi
January 21, 2023
in इतर घडामोडी
0
पै. सिंकदरच्या कथित विवादास्पद निकालावर पै. अस्लम काझी यांनी टीकाकारांचे टोचले कान
0
SHARES
1
VIEWS
  • नुकतीच पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा अंतिम सामन्यापेक्षा देखील जास्त उपांत्य फेरीमुळे रंगली. माती विभागातील पै. सिंकदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या सामन्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादग्रस्त ठरली. या सामन्यात पै. सिकंदरवर अन्याय झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली. या चर्चांना जातीय रंग देखील देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. याच मुद्यावरुन कुस्तीसम्राट अशी ओळख असलेल्या पै. अस्लम काझी यांनी कान टोचले आहेत. सिंकदर बाबतीत घडलेला प्रकार हा तो मुसलमान आहे म्हणून नाही तर गडबडीत झाला. त्यामुळे या प्रकाराला जातीय रंग देऊ नका, असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
  • “माती विभागातील अंतिम सामन्याबद्दल अनेकांचे मत आहे की या सामन्यात पक्षपातीपणा झाला. मात्र सुरुवातीपासून हा सामना अगदी पारदर्शकपणे सुरु होता. मात्र महेंद्रने बाहेरील डांग लावल्यानंतर एका बाजूने असे दिसले की सिकंदरवरुन आला आणि एका भूजावर पडला. त्यामुळे पंचानी चार गुण दिले. सिकंदरच्या कोचनी यासदर्भात हरकत घेतली. त्यावर निर्णय देताना ज्युरीनी गडबड केली असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी एकाच बाजूने बघून निर्णय घेतला. त्यांनी वेळ घेऊन चारही बाजूने तपासून निर्णय द्यायला हवा होता. त्यातच सिंकदरच्या कोचला आक्षेप घेताना ओढून नेतानाचा एक व्हिडीओ समोर आला त्यामुळे याला जास्त गालबोट लागले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचांना मी याबाबतीत बोललो तर त्यांच देखील म्हणणे आहे की महेंद्रला या डावासाठी दोन गुण आणि सिंकदरला एक गुण मिळायला हवा होता. इथे दोन गुणाची पार्शलिटी झाली. मात्र ही पार्शलिटी सिकंदर मुसलमान आहे म्हणून किंवा त्याला प्लॅन करुन हरवण्यासाठी झालेली नाही. ही फक्त अनावधानाने किंवा गडबडीत झालेली चूक आहे. जाणीवपूर्वक पंचांनी हे केलं असं मला वाटत नाही,” असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.
  • “मी जवळपास 20 वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात आहे. सिंकदर शेख प्रकरणात राजकारण सुरु आहे आणि त्याला जातीय रंग दिला जातोय असं दिसतंय. मात्र पैलवान हीच आमची जात असते. अस्लम काझी असो किंवा सिंकदर शेख याच्यावर केवळ कोणताही एक धर्म प्रेम करत नाही. सर्व जाती धर्माचे लोक आमच्यावर प्रेम करतात. आम्ही देखील दररोज बजरंग बलीच्या पाया पडतो किंवा त्याची सेवा करतो. बजरंगबलीचे नाव घेऊनच आम्ही आखाड्यात उतरत असतो. मला ज्याने तालीम बांधून दिली तो व्यक्ती मारवाडी समाजाचा आहे. मी मुसलमान आहे. आणि माझ्या तालमीचे नाव छत्रपती शिवराय कुस्ती संकुल आहे. कारण आमच्या इथे प्रत्येक जाती-धर्माचा माणूस असतो. कुस्ती हा खेळ हा कुठल्या एका जाती धर्माचा खेळ नाही. त्यामुळे इथल्या प्रकारांंना जातीय रंग देऊन नये,” असे मत कुस्तीसम्राट अस्लम काझी यांनी व्यक्त केले.

Previous Post

महर्षी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

शिवजयंती निमित्त DM प्रतिष्ठान तर्फे शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठीत मुर्ती वाटप

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
शिवजयंती निमित्त DM प्रतिष्ठान तर्फे शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठीत मुर्ती वाटप

शिवजयंती निमित्त DM प्रतिष्ठान तर्फे शिवछत्रपतींचे सिंहासनाधिष्ठीत मुर्ती वाटप

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026