सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी : चोरलेली इनोवा क्रिस्टा तामिळनाडूमध्ये पकडली

0
43

सोलापूर शहरातील विजापूर नाका हद्दीत संतोष नगर जुळे सोलापूर येथील सिद्धेश्वर आणराव पाटील यांची इनोवा क्रिस्टा क्रमांक एम एच बारा सी झेड 1008 ही चोरून नेलेली गाडी तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून जप्त करण्यात आली आहे. या गाडीला बनावट नंबर प्लेट एम एच 50 एल 45 67 लावून सदरची गाडी तामिळनाडू हद्दीत नेण्यात आली होती शिवाय त्या ठिकाणी या गाडीला 31 बी एच 31 31 हा बनावट नंबर लावून तिथे वापरात आणली गेली होती.

या गाडीच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अलफाज शेख, यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 20 टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. आणि या गाडीचा शोध लागला तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येथून ही गाडी जप्त करण्याच पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या टीमचे कौतुक केले