आक्षेप, मतमोजणी अन् विजयाचा गुलाल… पहा संपूर्ण घटनाक्रम

0
17

मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मत आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल हाती लागला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला.


10 जून 2022
सकाळी 9 वाजता मतदान सुरु

10 जून 2022
दुपारी 12 वाजता
भाजपकडून जितेंद्र आव्हाड,
यशोमती ठाकूर, सुहास

कांदेंच्या मतदानावर आक्षेप

10 जून 2022
दुपारी 1 वाजता

निवडणूक आयोगाने

भाजपचे आक्षेप फेटाळले

10 जून 2022
दुपारी 3 वाजता

काँग्रेसने भाजपचे सुधीर
मुनगंटीवारांच्या मतदानावर

आक्षेप

10 जून 2022
दुपारी 3.30 वाजता

राज्यातील निवडणूक
आयोगाच्या अधिकाऱ्यांनी

सर्व आक्षेप फेटाळले

10 जून 2022
संध्याकाळी 5.30वाजता

भाजपकडून केंद्रीय निवडणूक

आयोगाकडे आक्षेपाबाबत पत्र दिलं

10 जून 2022
संध्याकाळी 7 वाजता

शिवसेनेकडून आक्षेपाबाबत
केंद्रीय निवडणूक

आयोगाकडे पत्र

10 जून 2022
रात्री 9 वाजता

मुख्य निवडणूक आयुक्त
आणि राज्य निवडणूक

आयुक्तांची ऑनलाईन बैठक

10 जून 2022
रात्री 10 वाजता

मविआ, भाजपनंतर
काँग्रेसचं निवडणूक

आयोगाला स्वतंत्र पत्र

10 जून 2022
रात्री 10.15 वाजता
केंद्रीय निवडणूक

आयोगाची बैठक संपली

11 जून 2022

मध्यरात्री 12.15 वाजता

संजय राऊत निवडणूक
अधिकाऱ्याला जाब

विचारण्यासाठी गेले

11 जून 2022
मध्यरात्री 1 वाजता
सुहास कांदेंचं मत

बाद ठरवलं

11 जून 2022
1.15 वाजता

विधानभवनाबाहेर
पोलिसांचा फौजफाटा

वाढला

11 जून 2022

1.50 वाजता

मतमोजणी

प्रक्रिया सुरु

11 जून 2022
3 वाजून 7 मिनिटांनी

संजय राऊत, इम्रान प्रतापगढी,
प्रफुल पटेल, अनिल बोंडे,

पियूष गोयल विजयी

11 जून 2022
3.45 वाजता
भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय