१२ जूनला हुतात्मा स्मृती मंदिर येथे ‘ सैनिक स्कूल मार्गदर्शन ‘ कार्यक्रमाचे आयोजन

0
17

येस न्युज मराठी नेटवर्क : रविवार १२ जून रोजी सकाळी १०.३० वा. सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात ‘ सैनिक स्कूल मार्गदर्शन ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.देश प्रेमाने भारावून गेलेल्या तरुणाईला राष्ट्र कार्यात सहभागी होण्याची प्रबळ ईच्छा असते. विशेषत: डिफेन्स, मिलिटरी फोर्सच्या माध्यमातून देशाचे रक्षण करण्यासाठी, सीमेवर लढण्यासाठी सज्ज असणाऱ्या तरुणांना हे क्षेत्र करियरच्या दृष्टीने देखील आकर्षक ठरते. त्याकरिता आवश्यक पात्रता, शिक्षण, शारीरिक क्षमता काय असावी लागते?, त्याकरिता कोणते प्रयत्न केले पाहिजेत, कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात. त्याचे प्रशिक्षण इ. जुजबी माहितीही मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडते – त्यांची संधी हुकते.

राष्ट्राला सैन्य दलाची आणि युवकांना राष्ट्र कार्याची गरज असतेच, मात्र ती केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा अपुऱ्या माहितीमुळे अशक्य वाटू लागते.त्याची उकल करण्यासाठी सोलापुरात सैनिक स्कूल माहिती संदर्भातील हे उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना वरदान ठरणार आहे.सदर कार्यक्रमास लेफ्ट. कर्नल प्रकाश नरहरी, संस्थापक प्राचार्य सैनिक स्कूल कोडगु, तेजस्वी सातपुते (IPS), S.P., सोलापूर, सत्यासाई कार्तिक (IPS), कर्नल जी. एस.रेडेकर (रिटायर्ड)कॅम्पस Administration, Symbiosis Society, Pune याचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तरी विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्गांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करीत आहे.