• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 29, 2025
in इतर घडामोडी
0
लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार
0
SHARES
0
VIEWS

पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे. पुणे पोलिसांनी यूके हाय कमिशनला पाठवलेल्या पत्रानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हाय कमिशनकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ हा सध्या लंडनमध्ये आपल्या मुलासोबत राहत असून त्याचा व्हिसा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वैध आहे. घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असला तरी, तो परदेशातच असल्याने त्याच्या शोधासाठी यूकेतील स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी घायवळला तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली होती, आणि या प्रकरणी दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार सुरू आहे.

पुणे पोलिसांनी युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनकडे लिहिलेल्या पत्रात घायवळने पासपोर्ट मिळवताना बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. या पत्रात पोलिसांनी घायवळविरुद्ध दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उल्लेख करत त्याला तातडीने ताब्यात घेण्याची मागणी केली होती. घायवळने चुकीच्या पत्त्यावरून आणि घायवळ ऐवजी गायवळ असे बदललेले नाव वापरून पासपोर्ट मिळवला होता. तपासात अहिल्यानगर मधील या नावाचा पत्ता अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्याने केलेल्या फसवणुकीबाबत आता पोलिसांकडून स्वतंत्र तपासही सुरू आहे.

नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीने सप्टेंबर महिन्यात पुण्यातील कोथरूड परिसरात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गोळीबार आणि मारहाणीच्या घटना घडवल्या होत्या. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर, घायवळ आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु मुख्य आरोपी घायवळ मात्र 11 सप्टेंबरपासून परदेशात असल्याचे तपासात समोर आले.

बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून पासपोर्ट मिळवला

या आधी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करताना त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, घायवळने हे आदेश मोडून परदेशात पलायन केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आणि त्यानुसार पासपोर्ट रद्द करण्यात आला. पोलिसांचा संशय आहे की, घायवळने बनावट प्रतिज्ञापत्र सादर करून पासपोर्ट मिळवला आणि त्यात स्वतःविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे विधान केले.

कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता

सध्या घायवळ लंडनमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने राहतोय, अशी माहिती यूके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिली आहे. तथापि, घायवळविरुद्ध दाखल असलेले गंभीर गुन्हे आणि बनावट कागदपत्रांद्वारे परदेशात जाण्याच्या कारवायांमुळे भारत आणि यूके दरम्यान कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून त्याला परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यूके सरकारच्या सहकार्याने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Previous Post

दिलीप मानेंचं फिक्स..आज सोलापुरातील 28 जणांची भाजपमध्ये मेगाभरती..

Next Post

मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

मोहोळच्या नागनाथ क्षीरसागर व सोमेश क्षीरसागर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026