अनेक कृषीतज्ञ दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये भगवंत नगरीमध्ये होणार देशव्यापी सिताफळ व्यवस्थापन व संगोपन प्रशिक्षण कार्यशाळा…

0
30

भगवंत बार्शी बनतेय सिताफळाच क्लस्टर

बार्शी, दिनांक 8 ऑगस्ट : बार्शी येथील मधुबन फार्म अँड नर्सरीच्या वतीने गुरुवारी (दि.10) बार्शी परांडा बायपास चौकातील डॉ. नवनाथ कसपटे यांच्या मधुबन फार्म अँड नर्सरीतील सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत “एन एम के 1 गोल्डन” सीताफळ उत्पादन तंत्रज्ञान या विषयी सीताफळ उत्पादकासाठी मोफत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक प्रवीण कसपटे यांनी दिली.

याठिकाणी प्रत्येक तीन महिन्याला 200 प्रशिक्षणार्थींना ‘एन एम के 1’ (गोल्डन) सीताफळाच्या लागवडीपासून काढणी आणि विक्रीचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.

एन एम के 1 गोल्डन सीताफळाचे जनक डॉ. नवनाथ कसपटे हे यावेळी सीताफळ लागवडी पासून मार्केटिंग बाबत अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे कृषी आयुक्त, सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक, जिल्हा कृषी अधिक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक तज्ञ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या बार्शीची आता ‘सीताफळांचं क्लस्टर’ (Custard apple cluster) म्हणून ओळख निर्माण झाली आहे. डॉ. नवनाथ कसपटे यांनी बार्शी तालुक्यातील गोरमाळे परिसरात सीताफळाचे उत्पादन घेताना अहोरात्र परिश्रम घेत सीताफळाच्या तब्बल 42 जाती जोपासल्या आहेत. या माध्यमातून इतर हजारो शेतकरी लखपती, करोडपती झाले आहेत.

‘एन एम के 1’ (गोल्डन) सीताफळाचे जनक डॉ.नवनाथ कसपटे यांची ही किमया आणि शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. बहुसंख्य फळांच्या दराचे उच्चंक मोडत ‘एन एम के 1’ (गोल्डन) या वाणाच्या सीताफळाने ठोक बाजारपेठेत भाव खाल्ला आहे. प्रतिकिलो 280 रुपयांपर्यंतचा भाव प्रत्यक्ष शेतकऱ्याला या वाणाच्या विक्रीतून मिळाला आहे.

डॉ. नवनाथ कसपटे यांनी 1985 सालापासून सीताफळाचे विविध वाण संकलन करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे 42 वाणांची प्रत्यक्ष लागवड आहे. त्यामुळे ‘मधूबन फार्मा आणि रोपवाटिके’ मुळे बार्शी ‘सीताफळांचं क्लस्टर’ म्हणून नावारूपास आलं आहे.

डॉ. नवनाथ कसपटे यांच्या अथक प्रयत्नातून सीताफळाच्या विविध 2500 च्या आसपास प्रजातीचे ( वाण ) नमुने तयार केले असून, त्यापैकी काही प्रजाती ( वाण ) हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्यामुळे देशभरातून सीताफळाचे जनक, सिताफळ तज्ञ डॉ. नवनाथ कसपटे यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल आत्तापर्यंत त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करून त्यांना डॉक्टरेत पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मो क्रमांक : 9923137757 / 9881426974 वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.