सोलापूर: शेती ती उद्योग, व्यवसायासह समाजकारण आणि राजकारणात दबदबा असणारे घराणे म्हणून गेल्या चार पिढ्यांपासून सोलापूर शहरात प्रसिद्ध असणाऱ्या ‘थोबडे’ घराण्यातील चौथ्या पिढीतील संकेत महेश थोबडे हे वडिलांचा लैंड डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सांभाळतानाच हॉटेल व्यवसायासह नव्या व्यवसायात आपले वेगळेपण सिद्ध करत आहेत. प्रभावशाली नवउद्योजक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. एकाचवेळी अनेक आव्हाने पेलण्याची आवड असल्याने संकेत थोबडे यांनी वडिलांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करत असतानाच व्यवसायाचे नवे पर्याय निवडले. परदेशी उच्च शिक्षणासाठी जाताना येणाऱ्या अडी अडचणी अनुभवल्यानंतर संकेत यांनी परदेशी शिक्षणासाठी जावू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना विद्यापीठ निवडीसाठी सहकार्य व्हावे या उद्देशाने ‘अलीफ स्टडी ओव्हरसीज कन्सल्टन्सी’ या मान्यताप्राप्त कंपनीची अधिकृत शाखा सोलापुरात सुरू केलीय. त्याच बरोबर सोलापुरात येणाऱ्यापर्यटक आणि प्रवाशांसाठी संस्कृतीमुल्य जपणारे हॉटेल आणि लॉजच्या व्यवसायात पदार्पण केले आहे. संकेतजी हे व्यावसायिक स्थापत्य अभियंता असून राजमहेश बिल्डर्स या स्वतःच्या कंपनीत प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीत संकेत थोबडे यांनी संपूर्ण यूकेमध्ये प्रवास केला आहे. तसेच सिंगापूर, इस्रायल येथे अभ्यास दौरा म्हणून प्रवास केला आहे. उद्योगांना मदत करण्यासाठी अभ्यासाशी संबंधित अनेक संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले.
क्रेडाई सोलापूरचे व्यवस्थापकीय समिती सदस्यत्व असलेले सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. हजारो अभ्यागतांच्या संख्येसह त्यांनी 100 बिल्डर्स एक्स्पो कार्यक्रम आयोजित केले. यशस्वी परिणामांसह अनेक कॉर्पोरेट कार्यक्रम व्यवस्थापित केले. यूके स्थित कंपनी ऑप्टिमाइझ्ड बिल्डिंग्समध्ये इंटर्नशिप पूर्ण केली आहे. सेंट्रल ह्युमन राईट्स संघटन, दिल्ली राज्यस्तरीय मानवाधिकार परिषद राष्ट्रीय युथ सेलच्या उपाध्यक्षपदी नुकतीच त्यांची निवड झाली आहे. अशा या सामाजिक क्षेत्रात उज्ज्वल कार्य करणाऱ्या उद्योजकप्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा !