सोलापूर जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन सुरू ..!

0
17

जिल्हाभर कार्यालयात शुकशुकाट; जिल्हा प्रशासनास विविध संघटनांचे निवेदन
सोलापूर – जिल्हा परिषदेत आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनाची तोडफोड करणारे व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी साठी आज जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त करून काम बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. जिल्ह्यात सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी उस्फुर्त पण काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात येऊन काही व्यक्तींनी खिडक्यांचे काचा फोडले तसेच कार्यालयातील खुर्ची अस्ताव्यस्त केले. या घटनेचा निषेध आज सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी गेटवर व्यक्त करून आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन राजपत्रित अधिकारी संघटना व विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन दिले.

राजपत्रित अधिकारी यांचे वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी उप जिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन दिले. जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संधटनांचे वतीने उप जिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन दिले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना राजपत्रित संघटनेच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी निवेदन दिले. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, यांचे सह विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषेद मुख्यालयाचे मुख्य द्वारा जवळ अधिकारी कर्मचारी यांनी एकजुट दाखवून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. अधिकारी व कर्मचारी यांनी एकजुट दाखवून संबंधितांवर कारवाई करणे साठी जोरदार घोषणा देणेत आले.

शांयावेळी कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, लिपिक वर्गीय संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, संघटनेचे राजेश देशपांडे, कंत्राटी कर्मचारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जाधव, कर्मचारी संघटनेचे गिरीष जाधव, महसुल कर्मचारी संघटनेचे शंतनु गायकवाड, मध्यवर्ती शासकीय व निमशासकीय संघटनेचे समन्वयक अशोक इंदापुरे, जिल्हा प्राथमिक संघाचे मच्छिद्रनाथ मोरे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे शिवाजीराव पवार मरवडे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण वंजारी, महिला कर्मचारी संघटनेच्या अनुपमा पडवळे, नागेश पाटील, दिनेश बनसोडे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संधटनेचे मलिकार्जून देशमुख, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिन सोनकांबळे, सचिन मायनाळ, एस पी माने, यांचे सह शेकडो कर्मचारी यांचे सह सर्व गटविकास अधिकारी, उप अभियंता यांनी अधिकारी संधटनेचे वतीने निवेदन देणेत आले.

माझे कर्मचार्यांना बोललेले सहन करणार नाही – सिईओ मनिषा आव्हाळे
पोलिस प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केलेली आहे. सर्वानी शांततेच्या मार्गाने जा. मी कर्मचारी यांना हक्काने बोलेन मात्र माझे कर्मचारी यांनी कुणी बोललेले सहन करणार नाही. असे सांगून सिईओ मनिषा आव्हाळे यांनी कर्मचारी यांचे शी संवाद साधला. कार्यालयात आत येत असताना अधिकारी व कर्मचारी यांनी सिईओ यांना मुख्यालयां दरवाजाचे समोर सर्व कर्मचारी व अधिकारी आपले समवेत असल्याचा निर्धार केला.
सिईओ आव्हाळे म्हणाल्या, ज्यांनी हे कृत्य केले आहे अशांवर गुन्हा नोंद करणेत आलेला आहे. आपल्या यंत्रणेनेवर विश्वास ठेवा. संबंधितांवर नक्कीच कारवाई करतील. असे आवाहन कर्मचारी व अधिकारी यांना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले.

कारवाई होई पर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार – अतिरिक्त सिईओ कोहिणकर
सर्व राजपत्रित अधिकारी यांचे वतीने जिल्हा परिषदे मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी निंदनीय कृत्य करणारेंवर कठोर कारवाई न झालेस काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. उद्या बुधवारी याबाबत निर्णय घेणेत येणार असल्याचे कोहिणकर यांनी सांगितले.