सोलापूरात बनल्या हजारो पर्यावरणपुरक गणेशमूर्ती…

0
17

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण”, “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम” ची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणपुरक पद्धतीने सण व उत्सव साजरे होण्याकरिता सोलापूर महानगरपालिका,सोलापूर आणि पर्यावरणपुरक गणेशयुग यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची भव्य दिव्य कार्यशाळा पार पडली.

ही कार्यशाळा सोलापूर येथील राजीव गांधी इनडोर स्टेडीयम येथे झाली असून या कार्यशाळेच्या उद्घाटनास सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मचिंद्र घोलप हे उपस्थित होते. प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करायला हवी, मातीच्या बनवलेल्या मुर्त्या पर्यावरणाला हानी पोहचवत नाही, तसेच या गणेश मुर्त्या पाण्यामध्ये लवकर विरघळतात.

शाडूच्या मातीची मूर्ती तुम्ही घरच्या घरी बादलीमध्ये सुद्धा विसर्जित करू शकता. ह्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण देखील सुरक्षित राहील. असा संदेश उपायुक्त मचिंद्र घोलप यांनी दिला. सोलापूर शहरातील जवळपास दीड हजाराच्या वर सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांचा भरघोस सहभाग होता यावेळी गणेशयुगचे विकास गोसावी यांनी मुलांना पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले आणि मुलांनी अतिशय सुंदर कलात्मक गणेशमूर्ती बनविल्या जलप्रदूषण तसेच गणेशाची विसर्जना पश्चात होणारी विटंबना रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची चळवळ घरोघरी रुजावी हा कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
यावेळी गणेश युग परिवाराचे सचिन जगताप, असावरी गांधी, सोनाली वाघमोडे, वैष्णवी जंगम, कोमल पटेल, भूमीषा शहा, रेश्मा गोसावी, बसवराज जमखंडी यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.