मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील पदांसाठी आज आरक्षण सोडत

0
13

सोलापूर : – मंगळवेढा उपविभागातील पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत आज दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.00 वाजता तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी.आर. माळी यांनी दिली.
मंगळवेढा उपविभागातील मंगळवेढा तालुक्यातील 19 व सांगोला तालुक्यातील 12 अशा एकूण 31 रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरती प्रक्रीयेव्दारे भरण्यात येणार असून प्रवर्गनिहाय महिला पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रीया राबविली जाणार आहे.

मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढा, बठाण, रहाटेवाडी, तामदर्डी, गणेशवाडी, मेटकरवाडी, डोणज, कचरेवाडी, जुनोनी, कर्जाळ, अकोले, मुढवी, माळेवाडी, पौट,हुन्नुर, मानेवाडी, जालिहाळ, मुंढेवाडी, पाटखळ तर सांगोला तालुक्यातील शिवणे, वाकी (शिवणे), खिलारवाडी, सरगरवाडी, वझरे, यलमार मंगेवाडी, कारंडेवाडी (महिम), मिसाळवाडी, आगलावेवाडी, भोपसेवाडी, गावडेवाडी, चिणके या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची असुन, संबंधित गावातील इच्छुक उमेदवारांनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करीता आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष बी.आर. माळी यांनी केले आहे.