• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धो धो पावसात हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या मिष्कीली आणि कवितांमुळे रसिक श्रोते चिंब भिजले

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2024
in इतर घडामोडी
0
धो धो पावसात हास्यकवी अशोक नायगांवकरांच्या मिष्कीली आणि कवितांमुळे रसिक श्रोते चिंब भिजले
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी):- पुनर्वसु नक्षत्राचा पावसाने रविवारी सोलापूरकरांना अक्षरक्षः धुवून काढले आणि त्यातच ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिष्कीली आणि कवितांच्या कार्यक्रमातून उपस्थिती रसिक श्रोत्यांना चिंब भिजवले. महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने आयोजित ज्येष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिष्कीली आणि कविता या कार्यक्रमाचे रविवार दि. 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या मागे विद्या नगर मध्ये अविनाश महागावकर यांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.

दिवसभर मोकळे आकाश असल्याने सायंकाळी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल असे वाटले असतानाच आकाशात ढगांची गर्दी जमू लागली तशीच कार्यक्रमालाही दर्दी रसिकांची गर्दी होत असतानाच पावसाने बरसण्यास सुरूवात केली. एकीकडे पाऊस बरसत होता तर कार्यक्रमात हास्यकवी अशोक नायगांवकर हे आपल्या मिष्कीली आणि कवितांची बरसात करीत होते. उपस्थित रसिक मात्र मिष्कीली आणि कवितांच्या कार्यक्रमातून हास्याचे फवारे उडवत ओले चिंब भिजत होते.लोकमान्य टिळक, बहीणाबाई चौधरी, विंदा करंदीकर यांच्यावरील कविता तसेच माय ही गाजलेली कविता सादर केली आणि मिष्कीलीच्या माध्यमातून अनेक किस्से सांगून सध्याच्या घडामोडीवरही त्यांनी प्रकाश टाकला त्यातून रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा रेणुका अविनाश महागांवकर यांनी स्वागत केले. हास्यकवी अशोक नायगांवकर यांची ओळख महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे यांनी करून दिली. नंतर कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले तर आभार अमोल धाबळे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, पृथा हलसगीकर, राष्ट्रीय महामार्गाचे संजय कदम, डॉ. नितीन तोष्णीवाल, डॉ. प्रदीप देशमुख, सिध्देश्‍वर किणगी, अविनाश पत्की, राजु म्हमाणे, ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांच्या पत्नी वसुधा हलसगीकर, श्रृती शुभम महागांवकर, विशाल शिंदे, वंदना ताटे, सृष्टी ताटे, लता प्रदीप देशमुख, सोलापूर कारागृह अधिक्षक हरिभाऊ मिंड आदींसह मान्यंवर उपस्थित होते.

Tags: In Dho Dho rain
Previous Post

व्हील्स रोलर स्केटिंग क्लब आयोजित स्केटिंग स्पर्धेत १५० जणांचा सहभाग

Next Post

कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

Related Posts

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत

June 19, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
Next Post
कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026