एच. पी. व्ही लसीकरण व जनजागृती अभियान अंर्तगत आज एन. एम.वाडिया हॉस्पीटल येथे आज सकाळी मॉडर्न हायस्कूल मधिल ६५ विदयार्थीनीना एच. पी. व्ही लस देऊन या अभियानाची सुरवात करण्यात आली.
या वेळी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी सोलापूर शहारातील शाळां मधिल विदयार्थीना एच. पी. व्ही लस देण्यास बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंतर्गत मदत करण्यात येणार आहे. तसेच एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट यांचे वतीने लसीकरण व जनजागृती कार्यकमास मदत करणार तसेच उद्योगवर्धिनी सोलापूर यांचे मदतीने विविध शाळांमध्ये जनजागृती अभियान राबवणार असल्याचे सांगितले.


एच.पी. व्ही व सायकल कॅन्सर या बाबत जनजागृती करणे व एच पी व्ही लसीपासून कोणी वंचीत राहू नये या करीता सवींच्या मदतीने जास्तीस जास्त विदयार्थीना या लसीकरणाची माहीती तसेच दर अठवडयात एका शाळेचे उदिदष्ट ठेवून लवकरात लवकरत संपूर्ण शहरातील शाळांपर्यत पोहचण्याचा मानस आहे या तिन्ही संस्थेतील सदस्यांच्या मदतीने तो एका वर्षात पुर्ण करू असे या वेळी मार्गदर्शन करताना राम रेडडी सांगितले.
या वेळी मॉडर्न हायस्कूल च्या मुख्याध्यापिका शिल्पा जोशी यांचा सत्कार करण्यात आला. उद्योगवर्धि नी च्या चंद्रिका चौहान यांनी मॉडर्न हायस्कुल मधिल विदयार्थीनी , पालकांचे व शिक्षकांचे आभार मानले या कार्यक्रमास एन एम वाडिया हास्पीटल ट्रस्टचे सचिव शिरिष गोडबोले, डॉ राजेन्द्र घुली, डॉ ज्ञानेश्वर सोडल, डॉ अभिजित जिरगे, विधी सल्लागार व सदस्य नितीन हाबीष, कल्पेश जव्हेरी, उदयोगवर्धिनीचे मयांक चौहान मॉडर्न हायस्कुल च्या शिक्षिका संध्या कुलकर्णी व किर्ती कुलकर्णी बालाजी अमाईन्सचे अनिल विपत, दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड हे उपस्थित होते. या लसीकरण कार्यकमास एन. एम. वाडिया चॅरिटेबल ट्रस्टचे स्टाफ नर्स व कर्मचारी यांचे विशेष सहाकार्य लाभले.









