नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड आगारातून साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनासाठी विशेष बस सोडण्यात येणार आहेत .यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. 15 ऑक्टोबरला सकाळी सहा आणि सात वाजता या बस शक्तिपीठासाठी रवाना होतील. पिंपरी चिंचवड ,शिवाजीनगर ,स्वारगेट, कात्रज ,कोल्हापूर, तुळजापूर माहूरगड, सप्तशृंगी मार्गे पुन्हा पिंपरी चिंचवड अशा या बसेस मार्गस्थ होणार आहेत .
या बससाठी तीन हजार पाचशे वीस रुपये भाडे असणार असून ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जाणार आहे .तर ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे.











