• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू !

Yes News Marathi by Yes News Marathi
April 23, 2024
in इतर घडामोडी
0
रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू !
0
SHARES
1
VIEWS

स्थानिक मक्तेदाराकडे सोपवली दुरुस्तीची जबाबदारी

सोलापूर : बालाजी अमाईन्सच्या वतीने एक कोटी 27 लाख रुपये सीएसआर निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत बसविलेल्या विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अखेर ही विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचा आरोप करत महापालिकेने तत्काळ विद्युत दाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी तसेच दुरुस्ती कामासाठी महापालिकेने यापुढे मक्तेदार नेमावा, अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी मागील महिन्यात केली होती. महापालिका प्रशासनाने कार्यवाही करून ही विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने विद्युत दाहिनी दुरुस्तीसाठी एका मक्तेदारावर जबाबदारी सोपवली आहे. स्थानिक मक्तेदार दत्तात्रय कदम यांना यांच्याकडे हे काम देण्यात आले आहे.

कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करीत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी अमाईन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून सोलापूर महापालिकेच्या रुपाभवानी स्मशानभूमी येथे अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसविणे व आजूबाजुचा परिसर विकसित करण्यासाठी सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, श्रध्दांजली सभागृह / वेटिंग हॉल (१४मी. x १२मी.), पुरुष व महिला यांच्यासाठी २ स्वतंत्र स्वच्छता गृह युनिट व हातपाय धुण्याकरिता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युत दाहिनी परिसरास पूर्ण बंदीस्त करण्यासाठी चेनलिंक फेन्सिग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटे उद्यान, वृक्षारोपण,
अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्याकरिता मार्बलचे १७ बाकडे, पूर्ण परिसरास रंगरंगोटी व लाईट फिटींग्ज गुणवत्तापूर्ण, नेटक्या पद्धतीने पूर्ण करून देण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे मोठे काम शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे दि. 26 जानेवारी 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा दोन वर्षाचा करारही करण्यात आला. दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत दि. 5 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे मात्र मागील महिन्यात येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती.

विद्युतदाहिनी पूर्ववत सुरू
केली : संदिप कारंजे

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी एका मक्तेदारावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे यापुढे कोणतीही गैरसोय होणार नाही, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितले.

उद्योजक केतन वोरा यांनी मानले महापालिकेचे आभार

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद पडली होती. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने विद्युत दाहिनी मक्तेदार नेमून दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी केली होती. या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. अखेर महापालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि ही विद्युत दाहिनी सुरू झाली आहे. मक्तेदारही नेमला आहे. कार्यवाही झाल्याने समाधान वाटले. नागरिकांची गैरसोय टळली, असे सांगत उद्योजक केतन वोरा यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

Tags: cemeteryElectricityRupabhavani
Previous Post

शस्त्रानिशी दहशत माजविणारा मुकेश ऊर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले एमपीडीए अन्वये स्थानबध्द

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सोलापूरात जाहीर सभा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026