• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आळंदीत आज ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे वितरण, मंत्री मुनगंटीवारांसह अजित पवार राहणार उपस्थित

Yes News Marathi by Yes News Marathi
March 26, 2023
in मुख्य बातमी
0
आळंदीत आज ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे वितरण, मंत्री मुनगंटीवारांसह अजित पवार राहणार उपस्थित
0
SHARES
1
VIEWS

आळंदीत आज (26 मार्च) ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे वितरण होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता फ्रुटवाला मैदान इथं हा सोदळा संपन्न होणार आहे. यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी तसेच महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या पुरस्कारांच वितरण होणार आहे. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती निलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचं स्वरुप
दरवर्षी राज्य शासनाच्या वतीनं संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी देखील या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीनं प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित करण्यात येते. पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना 2019-20 साठीचा, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना 2020-21, स्वामी श्री गोविंददेव गिरी यांना 2021-22, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना 2022-23 साठीचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
यापूर्वी पुरस्कार मिळालेले मानकरी
यापूर्वी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ. किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.
भक्तीसागर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी भक्तीसागर या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार आहेत. तर पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक झाला’ आणि ‘हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रमाला सर्व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

Previous Post

गौतमीच्या तीन गाण्याला तीन लाख,आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार; इंदुरीकरांनी घेतला समाचार

Next Post

ISRO ने 36 OneWeb इंटरनेट उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले

Related Posts

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
Next Post
ISRO ने 36 OneWeb इंटरनेट उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले

ISRO ने 36 OneWeb इंटरनेट उपग्रह वाहून नेणारे भारतातील सर्वात मोठे रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले

ताज्या बातम्या

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

मंगळवेढा पोलीस ठाण्यातील विनयभंगाचा गुन्हा न्यायालयात सिद्ध; आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड

July 31, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026