सोलापूर: जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्या विशेष निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर करीता -०६,मिनी बस १०महेंद्रा बलेरो निओ , -०१ महेंद्रा स्कार्रिपिओ, ०५ हिरो मोटार सायकल असे वाहन पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आज पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. सदरचे वाहन मा. सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन) यांचे ताब्यात देऊन एम.टी.ओ मार्फत जनतेला लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याकरीता संबंधित पोलीस विभागास वाहन वाटप करण्याबाबत आदेश केले.
सदर कार्यक्रमावेळी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) प्राजंली सोनवणे, सहा पोलीस आयुक्त (प्रशासन/नियंत्रण कक्ष) उबाळे, वरीष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते.