• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपास !

Yes News Marathi by Yes News Marathi
February 5, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमधील वाद विकोपास !
0
SHARES
0
VIEWS

मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील या दोघांमध्ये आता राजकीय वाद विकोपास गेला आहे. एकमेकांवर जोरदार टीका करत त्यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. “माझा नाद केला तर मी कोणाला सोडणार नाही, नरखेडच काय, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुमचा सातबारा अन् सगळी कुंडली बाहेर काढीन, रेकॉर्डिंगचे काय घेऊन बसलात” असा सज्जड दमच आमदार माने यांनी उमेश पाटील यांना दिला आहे.

राष्ट्रवादीचं गड असलेल्या मोहोळ तालुक्यातच राष्ट्रवादी पक्षात संघर्ष पेटला आहे. उमेश पाटील आणि यशवंत माने यांचा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार विरुध्द राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष असा टोकाचा संघर्ष राष्ट्रवादी अंतर्गतच सुरू झाला आहे. उमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार यशवंत माने यांच्यावर जाहीरपणे जोरदार टीका केली होती. या टीकेलाच प्रत्युत्तर आमदार माने यांनी दिले आहे. मोहोळ येथील मोरवंची या गावात एका कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार माने यांनी उमेश पाटील यांच्यावर टिकेची तोफ डागत, त्यांना ओपन चँलेंज दिले. ‘शरद पवारांचे चार वेळा व्यासपीठावर नाव घेता, काय अधिकार आहे तुम्हाला पवारांचे नाव घेण्याचा, ज्या माणसामुळे पद मिळाले, त्यांच्याबद्दल पाच वर्षे आगपाखड करत फिरता लाज वाटायला पाहिजे’ या शब्दात आमदार माने यांनी उमेश पाटील यांच्यावर घणाघाती वार केला.

आपल्या आमदारकीच्या तीन- सव्वा तीन वर्षाच्या कार्यकाळात उमेश पाटील यांच्याबद्दल बरसून टिका केली. माने म्हणाले, ‘उमेश पाटीलांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाचा वापर करत राष्ट्रवादी एकजूट करण्याऐवाजी, तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नुसती भांडणे लावून दिली. जिल्हा राष्ट्रवादीमध्ये दुफळी तयार केली, असा आरोप त्यांनी केला.

बाकीच्यांना बाजूला ठेवणाऱ्या उमेश पाटील यांनी मागील सहा वर्षात केलं तरी काय? ज्यांच्याकडे पाया पडत जिल्हा परिषदेची उमेदवारी पदरात पाडून घेतली, त्यांची तरी त्यांनी थोडीतरी जाण ठेवली का? पक्षातील राजन पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचे राजकारण त्यांनी केले. पोलिसांवर दबाव निर्माण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनावरच 307 व इतर गुन्हे त्यांनी टाकले. अशा प्रकारचे दबावतंत्र आपण यापुढे चालू देणार नाही.पाटील यांनी आपल्या लायकीत राहावे, असे ही आमदार माने म्हणाले.

Previous Post

कसबा, चिंचवडची निवडणूक होणारच : विरोधी पक्ष नेते अजित पवार

Next Post

टिळकांना उमेदवारी देतो,..बिनविरोध करता का ? ; पटोलेंना चंद्रकांतदादांचे आवाहन

Related Posts

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
इतर घडामोडी

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती
इतर घडामोडी

राज्यातील ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, २५ नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती

August 21, 2026
Next Post
टिळकांना उमेदवारी देतो,..बिनविरोध करता का ? ; पटोलेंना चंद्रकांतदादांचे आवाहन

टिळकांना उमेदवारी देतो,..बिनविरोध करता का ? ; पटोलेंना चंद्रकांतदादांचे आवाहन

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026