सोलापूर : धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोलापूर निमा शाखेच्या वतीने निमा भवन येथे धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी दीपावलीमध्ये आयुर्वेदाचे प्रवर्तक व आरोग्य देवता भगवान धन्वंतरी यांचे डॉक्टरांकडून भक्ती भावाने पूजन केले जाते. यंदा युनिटी हॉस्पिटलचे संचालक चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते व निमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर साहेबराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये धन्वंतरी मूर्तीचे पूजन करण्यात आले.अश्विनी पुजारी यांनी आपल्या सुमधुर आवाजात धन्वंतरी स्तवन व आरती सादर केली. यावेळी निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ जिड्डीमनी, सचिव डॉक्टर अभिजीत पुजारी, कोषाध्यक्ष डॉक्टर प्रवीण ननवरे, राज्य समन्वयक डॉ. रविराज गायकवाड, एक्झिक्यूटिव्ह मेंबर डॉक्टर राजश्री मठ ,निमा वुमन्स फोरम प्रेसिडेंट डॉक्टर श्रुती मराठे, सेक्रेटरी डॉक्टर पल्लवी भांगे , ट्रेझरर डॉक्टर अश्विनी देगावकर सुट्न्ड फोरम अध्यक्ष समर्थ वाले यांची उपस्थिती होती.
यानंतर प्रमुख पाहुणे युनिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर बिरादार, डॉक्टर राहुल कुलकर्णी, डॉक्टर सिद्धाराम बगले, डॉक्टर प्रकाश झाडबुके यांचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे निमा सोलापूर आयुर्वेद फोरम अध्यक्षपदी निवड झालेले वैद्य महेशकुमार बिळूरे, सचिव वैद्य योगेश उडगीकर , ट्रेझरर डॉक्टर सुरेश धायगुडे यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर यांनी धन्वंतरी पूजनाचे महत्त्व व निमाचे योगदान यावर उपस्थितांना उद्बोधित केले. डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी युनिटी हॉस्पिटल बाबत माहिती देऊन एनपीएलला पुर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अश्विनी देगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिजीत पुजारी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी केले.








