पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

0
18

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी वारकऱ्यांनी स्वागत केले. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.