अग्निपथ योजनेची घोषणा, सैन्यात ४ वर्षांसाठी तरुणांची होणार भरती

0
11

येस न्युज नेटवर्क : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्नीवीर असे संबोधले जाणार आहे. या याजनेमुळे रोजगासुद्धा वाढणार असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. सैन्यात ४ वर्षांसाठी भरती करण्यात येणार आहे. शॉर्ट टर्म साठी सैन्यात सामील करण्यात येईल. तीन सेवांच्या प्रमुखांनी दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेची माहिती दिली होती, ज्यामुळे सैनिकांना अल्प कालावधीसाठी सैन्यात सामील करण्याचा मार्ग मोकळा होईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. मागील काही वर्षामध्ये भारतीय सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने काही पाऊले उचलली आहेत. सुरक्षा दलाची ताकद वाढवण्यासाठी अग्निपथ योजनेची राजनाथ सिंह यांनी घोषणा केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक परिणाम या योजनेमुळे होणार असल्याचे राजनाथ सिहं यांनी सांगितले. सैन्याचे सक्षमीकरण करण्यासाठी योजना आणण्यात आली आहे.