येस न्युज मराठी नेटवर्क । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबर 64 वा महापरिनिर्वाण दिन असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे….