आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे अधिक श्रावण मासारंभ निमित्ताने हबीब बालक आश्रम येथील मुलांसोबत आधार आश्रमातील ज्येष्ठांसोबत एकदिवसीय सहल

0
27

ज्यांना व्यवस्थित चालता येत अश्या आजीआजोबांना घडवून आणल वटवृक्ष स्वामी सर्मथ महाराजांच दर्शन

आश्रमातून जेव्हा आश्रित लहान मुलांना व आजीआजोबांना घ्यायला आस्था फाऊंडेशन ची टीम गेली तेव्हा हयांचा उत्साह व त्यांच्या डोळयात एक आनंदाची आतुरता दिसली. जिथ अश्या समाजातील दुर्लक्ष असलेला हा वर्ग रोजच्या अन्न व निवा-यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत तिथे देवदर्शन करणे तर खुपच कठीण परिस्थिती परंतु आस्था फाऊंडेशन चे टीम च्या वतीने आधार वृध्दाश्रमातील आजी आजोबा व हबीब अनाथ आश्रमातील बालकांचे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले.

त्यासाठी 3 अश्या गाडयांचे नियोजन केल गेल ज्यामध्ये सर्व जण अगदी लहानांपासून वयस्करांना सहजासहजी चढु उतरु शकतील अश्या त्यामुळे आजीआजोबांना व लहानाग्यांना गाण्याच्या भेंडया,नकला,पोहाडा सादरीकरण करता आल. प्रवासाचा पुर्ण आनंद घेत अक्कलकोटला कसे पोहोचले कळल नाही.

सर्व प्रथम स्वामींच्या समाधी मठातून दर्शन घेऊन पुढे मुख्य वटवृक्ष मंदिरात सर्व नियमांचे पालन करुन इतक्या गर्दीत ही शिस्तबद्ध पणे स्वामींचे दर्शन व शेवटी अन्नछत्रात महाप्रसाद पण दिला. अश्या एक दिवसीय तिर्थक्षेत्र सहलीतुन परतताना बालाकांनी व ज्येष्ठांनी आस्था फाऊंडेशनचे धन्यवाद व आभार मानले व डोळयातुन अश्रुंनी निरोप दिला.

खरच या सा-यांचा मेळ बसवण्यासाठी नियोजन साठी व आम्हांला सहकार्य करणाऱ्या अक्कलकोट अन्नछत्राचे अध्यक्ष मा.उदयनराजे भोसले ,श्री.अभय खोबरे यांच सहकार्य लाभले तर आस्था ची संर्पण टिम अध्यक्षा कांचन हिरेमठ , नीलिमा हिरेमठ , गीता भोसले मॕडम , पूजा पुकाळे मॕडम , अनिता तालीकोटी मॕडम ,निता गंगणे ,कोळी मॕडम ,पुनम व श्री ,पुष्कर पुकाळे ,छाया गंगणे आदींचे सहयोग लाभले.