• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2022
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ!
0
SHARES
0
VIEWS
  • 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार
  • 50 संशोधकांना पीएच.डी पदवी तर 57 सुवर्णपदकाचेही वितरण होणार

सोलापूर- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवार, दि. 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार असून यावेळी एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता दीक्षांत सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. प्रथम प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.  

यावर्षी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी प्रदान केली जाणार आहे. पीएचडी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37 मुले तर 13 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 57 विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. यंदा नवीन चार सुवर्णपदकाची वाढ झालेली आहे. विविध विषयात गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तब्बल 32 मुली तर 25 मुलांचा समावेश आहे.

मार्च 2022 ला उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर  मिळेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू आहे.

या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, सीए श्रेणीक शाह, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

Previous Post

विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या रिध्दी आणि सिध्दीची बाजी…

Next Post

अभिनेत्री सोनल चौहानचे जबरदस्त गोल्डन ऑफ शोल्डर फोटोशूट!

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
अभिनेत्री सोनल चौहानचे जबरदस्त गोल्डन ऑफ शोल्डर फोटोशूट!

अभिनेत्री सोनल चौहानचे जबरदस्त गोल्डन ऑफ शोल्डर फोटोशूट!

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026