• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देशाच्या प्रगतीत विकास पत्रकारितेचे योगदान मोठे: डॉ. काकडे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 28, 2023
in इतर घडामोडी
0
देशाच्या प्रगतीत विकास पत्रकारितेचे योगदान मोठे: डॉ. काकडे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर विद्यापीठात विकास पत्रकारितेवर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

सोलापूर, दि. 28- भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खूप मोठा असून येथील वृत्तपत्र व पत्रकारांची भूमिका ही नेहमीच देशाच्या विकासासाठी राहिली आहे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी विकास पत्रकारितेची अतिशय गरज असून आजपर्यंत विकास पत्रकारितेने मोठे योगदान दिल्याचे गौरवोद्गार विजापूर येथील कर्नाटक स्टेट युनिवर्सिटीचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. ओंकार काकडे यांनी काढले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभाग, सोलापूर विज्ञान केंद्र आणि सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञान, पर्यावरण आणि विकास पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन डॉ. काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. माया पाटील या होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार, मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठातील डेव्हलपमेंट कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. मीरा देसाई, मध्य प्रदेशातील माखनलाल चतुर्वेदी विदयापीठाचे डॉ. संदीप भट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तविदया विभागातील प्रा. योगेश बोराटे, जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, विज्ञान केंद्राचे संचालक राहुल दास, सुसंवाद संघटनेचे सचिव सचिन गायकवाड यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मासकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘सोशल मिडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. पुढे बोलताना डॉ. काकडे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे मोठे संशोधन होऊन विकास होत असल्याचे स्पष्ट केले. विकास पत्रकारितेसाठी या बाबी फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. माया पाटील यांनी डॉ. चिंचोलकर यांनी मास कम्युनिकेशन विभागाचा मोठा विकास केला व पर्यायाने विद्यापीठाचाही विकास झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

‘माध्यमांची विकासात भूमिका’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे, सकाळचे वरिष्ठ पत्रकार रजनीश जोशी, दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी माध्यमांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. अंबादास भासके यांनी मानले.

फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित विकास पत्रकारितेवरील राष्ट्रीय परिसंवादात डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘सोशल मिडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना विजयपूरचे माजी कुलगुरू डॉ. ओंकार काकडे, डॉ. माया पाटील, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, डॉ. मीरा देसाई, डॉ. निशा पवार व अन्य.

Tags: Contributiondevelopment journalism
Previous Post

सोलापूरच्या जयराज कुमणे अन् अथर्व काळेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Next Post

विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते झाले उदघाटन

Related Posts

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
इतर घडामोडी

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
Next Post
विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते झाले उदघाटन

विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते झाले उदघाटन

ताज्या बातम्या

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026