सोलापूरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करण्याचा आयुक्तांचा निर्णय

0
30
  • सोलापूर : शहरातील महापालिकेच्या जागेवर दोन ठिकाणी पेट्रोलपंप सुरू करणार आहे, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त शितल तेली-उगले यांनी पत्रकारांना दिली.
  • दरम्यान, शहरात महापालिकेच्या अनेक जागा वापराविना पडून आहेत. त्यापैकी सात रस्ता परिसरातील बस डेपो व हैद्राबाद रोडवरील जकात नाक्याच्या जागेवर दोन पेट्रोलपंप सुरू करण्यात येणार आहे. हा पेट्रोलपंप एखाद्या कंपनीला चालविण्यास द्यायचा की महापालिकेकडून चालविण्यास घ्यावयाचा या संदर्भात निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. शहरात सध्या सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पेट्रोलपंप आहेत. त्याच दृष्टीने हे पेट्रोलपंप असणार आहेत. या पेट्रोलपंपामुळे महापालिकेच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल असेही आयुक्तांनी सांगितले.
  • शहरात सध्या महापालिकेच्या अनेक जागा पडून आहेत. त्या जागा वापरात आणण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. काही जागांवर बीओटी प्रकल्पातंर्गत विविध मॉडेल्स उभा करण्याचा निर्णयही महापालिका घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. पूर्वी पेट्रोलपंप सुरू करण्याबाबतचा निर्णय झाला होता, मात्र त्याला योग्य तो प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.