Home मुख्य बातमी हातात पिस्तुल घेऊन बुलेट चालवत व्हिडीओ केला व्हायरल; या नगरसेवकाच्या पुत्रावर गुन्हा...
- सोलापूर – रंगपंचमी हा सण सोलापूरकरानी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नागरिकांनी रंग खेळतानाचे अनेक रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. याच धर्तीवर नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी काही रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. मात्र या रिल्समुळे त्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन हे रिल्स तयार करण्यात आले आहेत. हे रिल्स सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी नगरसेवकपुत्रांविरोधात याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सलगर वस्ती पोलीस सोशल मीडियावर वायरल झालेल्या रिल्समुळे सतर्क झाले आहेत. रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्तूल जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे. खरी पिस्तूल असेल तर, ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाणार आहे.