सोलापूर जिल्हा परिषदेचे बजेट सादर

0
20

सन २०२३-२४ चे मुळ अंदाजपत्रकातील विभागनिहाय योजना खालीलप्रमाणे आहेत.

बांधकाम, आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण इ. खात्यांना भरीव तरतूद

  • कृषि विभाग :-
    • कृषि विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीमध्ये वाढ करुन एकूण रु.३७०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
    • कृषि अभियांत्रिकी योजनेंतर्गत ट्रैक्टर चलित औजारे, ट्रैक्टर, रोटावेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र रोटरी टिलर यासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. जेणेकरून सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक औजारांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.
    • शेतकरी व पशुपालक यांचेसाठी कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी फिल्टर या सुधारित औजारांचा वापर व्हावा, म्हणून रक्कम रुपये ५.०० लक्ष इतकी रक्कम वाढ करुन रक्कम रु. ११०.०० लक्षची भरीव तरतूद केलेली आहे. • तसेच पीक विविधकरण अंतर्गत कडधान्य व गळीत धान्य पीकामध्ये विविधकरण करणे या नविन योजनेचा अंतर्भाव करुन त्यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
  • पशुसंवर्धन विभाग
    • पशुसंवर्धन विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.१८.०२ लक्ष इतकी वाढ करुन पशुसंवर्धनसाठी एकूण र.रु.३२५.०३ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे. पशुंच्या दुग्ध वाढीसाठी क्षार व जीवनसत्व औषध पुरवठा करणेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी वंध्यत्व निवारण कार्यक्रम अंतर्गत रक्कम रु.१०.०० लक्ष वाढ करून रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.
    • आर्थिकदृष्टया मागासलेल्या शेतकरी व शेतमजूर यांना चार शेळया व एक बोकड वाटप योजनेसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष, पशुपालकांना मिल्कींग मशीन पुरविणेसाठी रक्कम रु.३०.०० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.
    • स्तनदाह निर्मुलन कार्यक्रम यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष तसेच देशी कुक्कूट पक्षी संगोपन करणाऱ्या कुक्कूट पालकांना प्रोत्साहनपर अनुदान यासाठी रक्कम रु.१.०० लक्ष इतकी तरतूद या नविन योजनांचा अंतर्भाव केलेला आहे.
  • सार्वजनिक आरोग्य विभाग :-
    • आरोग्य विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.७८.४२ लक्ष इतकी वाढ करुन आरोग्य विभागासाठी एकूण र.रु.४३०.३१ लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.
    • प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी औषधे खरेदीसाठी र.रू.१००.०० लक्ष, • श्वानदंश लस, सर्पदंश लस खरेदीसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, जिल्हास्तर / तालुकास्तर/ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर/उपकेंद्र स्तर वीज, पाणी, दुरध्वनी, इंधन, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया सर्जन वाहन इंधन इ. या योजनेत रक्कम रु.२५.०० लक्ष इतकी वाढ करुन त्यासाठी रक्कम रु.१००.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.
    • ग्रामीण जनतेला असाध्य रोगावरील उपचारासाठी अर्थसहाय्य यासाठी रक्कम रु.१६.०० लक्ष वाढ करुन चालू अंदाजपत्रकात र.रु.३०.०० लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.
    • प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडील जैव घनकचरा विल्हेवाट लावणे यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष तसेच कार्यालयाच्या देखभाल व दुरुस्ती या सुविधांसाठी रक्कम रु.१०.०० लक्ष इतकी तरतूद करुन या नविन योजनांचा समावेश करणेत आलेला आहे.
  • समाजकल्याण विभाग :-
    • समाजकल्याण विभागासाठी रक्कम रू.२१६.१८ लक्ष व अपंग कल्याण निधीसाठी रक्कम रू. २२५.०५ अशी एकूण र.रु.४४१.२३ लक्ष इतकी भरीव तरतूद केलेली आहे.

• शेळीपालन गट अनुदान रक्कम रु.२५.०० लक्ष,
• ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४०.०० लक्ष,
• व्यवसाय व तांत्रिक प्रशिक्षण योजनांतर्गत Tally (संगणक) प्रशिक्षणासाठी रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी तरतूद करणेत आलेली आहे.

  • भजनी मंडळास साहित्य पुरविणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, मागासवर्गीय वसतीगृहांना वाटर प्युरीफायर मशिन पुरविणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, मागासवर्गीय बचत गटांना केटरींग साहित्य, साऊंड सिस्टीम, मंडप साहित्यांकरिता अर्थसहाय्य यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाज मंदिरांमध्ये वाचनालये तयार करणे यासाठी रक्कम रु.४६.०० लक्ष या नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करुन त्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे.
  • दिव्यांगासाठी या अर्थ संकल्पात दिव्यांग पुनर्वसन केंद्र यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष, दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट किट यासाठी रक्कम रु.१०.०० लक्ष, क्रिडा प्रबोधिनी आयोजित करणेसाठी रक्कम रु.१५.०० लक्ष दिव्यांगाना स्पर्धा परीक्षेकरिता वाचनालये तयार करणेसाठी रक्कम रु.२७.०० लक्ष तसेच दिव्यांगाना कला अॅकॅडमी अनुदान यासाठी रक्कम रु.२०.०० लक्ष तरतूद करुन अपंगांच्या कल्याणासाठी नविन योजनांचा समावेश करणेत आलेला आहे.
  • महिला व बालकल्याण विभाग:-
    महिला व बाल कल्याण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु. ३९.९९ लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु.३२१.०६ लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
  • ग्रामीण पाणी पुरवठा विभाग:-
    ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी चालू अंदाजपत्रकात एकूण र.रु. २३०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
  • लघु पाटबंधारे:-
    लघु पाटबंधारे विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.७५.०० लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु. २००.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
  • शिक्षण विभाग :-
    • शिक्षण विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.१५.०६ लक्ष इतकी वाढ करुन शिक्षण विभागासाठी एकूण र.रु.५७१.१० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.
    • जिल्हा परिषद शाळांना संगीत साहित्य उपलब्ध करुन देणेसाठी रक्कम रु.१०.०० लक्ष,
    • जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या देखभाल, दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी रक्कम रु. २२५.०० लक्ष इतकी भरीव तरतूदी करणेत आलेली आहे.
    • इ.५वी ते ८वी स्कॉलरशिप परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे फी भरणेसाठी रक्कम रु.२०.०० लक्ष, स्काऊट गाईड / कबबुलबुल साठी रक्कम रु.१०.०० लक्ष
    विद्यार्थ्यांचे संपादणूक पातळी वाढविणेकरिता शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देणे यासाठी रक्कम रु.३०.०० लक्ष तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणेसाठी शाळेतील ग्रंथालय समृध्द करणे या नविन योजनांसाठी रक्कम रु.४०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.

बांधकाम विभाग :-
बांधकाम विभागासाठी मागील वर्षीच्या मूळ तरतूदीपेक्षा रक्कम रु.५३.०० लक्ष इतकी वाढ करुन एकूण र.रु.१०४०.०० लक्ष इतकी तरतूद केलेली आहे.