• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट…..

Yes News Marathi by Yes News Marathi
May 24, 2024
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट…..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षापासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नव तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

         जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नव तंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मराठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळिंब फळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञ यांच्याशी त्यांनी चर्चा केली. डाळिंब फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगावर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे वाण तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली.

        कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येणार असून डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

         बीबीदारफळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष निळ यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली. शेतकरी संतोष निळे यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे. ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय.  ही पद्धत बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केलेली आहे. या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ मिळते अशी माहिती माने यांनी यावेळी दिली.

         पाकणी येथील डाळिंब पिकवणारे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळिंब फळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळिंब फळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल, प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी
मोहोळ तालुक्यातील हिवरे येथील भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन या कंपनीच्या कामकाजाची माहिती घेतली तसेच कंपनीला पुढील काळात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास ती सोडवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी कंपनी जवारीचे क्लिनिंग, ग्रेडिंग, ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंग कशा पद्धतीने करत आहे याविषयीची माहिती त्यांनी जाणून घेतली. कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत आणखी शेतकरी उत्पादक कंपन्या जिल्ह्यात कशा पद्धतीने स्थापन करता येतील याविषयी कृषी विभाग व आत्मा ने नियोजन करावे असेही त्यांनी सूचित केले.

        ही भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनी ज्वारी उत्पादनात अग्रेसर असून या कंपनीचा न्यूट्री सोर्घ हा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला आहे, अशी माहिती कंपनीचे प्रमुख सचिन थिटे यांनी दिली.

        यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार  व कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भुसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
Next Post
अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अन्नधान्य पिके अंतर्गत अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026