‘या’ ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून घडविले जात आहेत बाल वारकरी…!

0
20

सोलापूर : सोलापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संगीत विद्यालयाच्या वतीने दि.१४ मे ते मंगळवार २३ मे २०२३ पर्यंत भव्य मृदंग तपस्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. ज्योतीराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव मंदिर जुनी लक्ष्मी चाळ येथे सांय ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या मृदूंग तपस्येमध्ये मुल व मुलींना वारकरी सांप्रदायिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. यामध्ये हरिपाठ, कीर्तन, संगीत भजन, भारुड, दिंडी, शास्त्रीय मृदंग वादन, मृदंग सोलो वादन या सर्व अंगांनी विद्यार्थी यांची मृदंग वादनाची तयारी करून घेण्यात येत आहे . या कार्यक्रमामध्ये नवीन विद्यार्थ्यांना वारकरी पाऊल शिकवणे, वारकरी सांप्रदायिक संस्कार करणे अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमात मार्गदर्शनासाठी महाराष्ट्रातील नामवंत महाराज मंडळी, गायक, वादक उपस्थित असतात. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.बळीराम महाराज जांभळे ह.भ.प गणेश चांगभले, वैभव परबत, शंतनु जगताप यांचे सहकार्य लाभत आहे.