केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या समितीत बदल, सरन्यायधीशांऐवजी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश

0
28

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या नेमणुकांबाबत आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीच्या समितीत बदल करण्यात आला आहे. या समितीत देशाचे प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एक ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त ठरवण्यासाठी समितीची रचना केंद्र सरकारने जाहीर केली आहे.

सुप्रीम कोर्टाने मार्चमध्ये ऐतिहासिक निकाल देत निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीत ऐतिहासिक बदल करत यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सरन्यायाधीशांची समिती सुचवली होती. सरकारने सरन्यायाधीश वगळून ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याचा समावेश केला आहे. केंद्र सरकारने योग्य कायदा करेपर्यंत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश यांची समिती निवड करेल असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं जाहीर करत या समितीत सरन्यायाधीशाऐवजी मंत्रीमंडळातील एक ज्येष्ठ मंत्री असतील. पंतप्रधान आणि जेष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणजे तीन जणांच्या समितीत आधीच 2-1 असं बहुमत असणार आहे.