साताऱ्यातील ‘माईल स्टोन’ ठरलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे छत्रपती संभाजी महाराज नामकरण; राज्य शासनाचा निर्णय

0
22

सातारा; जिल्ह्याच्या दृष्टीने माईल स्टोन ठरलेल्या आणि सातारकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यामुळे जिल्हावासियांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे अनेक दिवसांपासूनच्या नामकरण विषयीच्या चर्चाना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. हे महाविद्यालय जलसंपदा विभागाच्या २५ एकर क्षेत्रावर उभे राहत असून यासाठी तब्ब्ल साठ एकर जागा हस्तांतरित झाली आहे या महाविद्यालयाच्या विविध इमारतीच्या बांधकाम आराखड्याचे कामही तयार आहे तर सुमार ४९५ कोटी रुपयांचा भरगोस निधीही मंजूर आहे १०० प्रवेश क्षमता या महाविद्यालयाची असेल तर यासाठी ५०० खाटांचे रुग्णालय हे दिल्ली आणि बारामती च्या धर्तीवर असणार आहे.

या महाविद्यालयाला महापुरुषांची नावे देण्यावरून विविध संघटनांनी अनेक आंदोलनही केली होती बुधवारी राज्य शासनाने छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या इमारतीला देऊन चर्चाना पूर्णविराम दिला आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई याना याबाबत त्वरित कारवाई चे आदेश हि देण्यात आले आहेत सातारा शहर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत असे एक ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे या शहराला साजेसे नाव क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिल्याने शहर वासियांनी स्वागत केले आहे.