येस न्युज मराठी नेटवर्क : मी काम करते, हाच माझा पिंड आहे. मी तुम्हाला शब्द देते. माझा शब्द इतरासारखा नाही. त्या मोदी आणि भाजपसारखा तर नाहीच नाही. भाजप, मोदी खोटारडे, हे लोकं खोटं बोलतात पण रेटून बोलतात. असा खणखणीत आरोप आमदार प्रणिती शिंदेंचा यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमरस प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील जवळगी, सलगर, बावची आदी गावात प्रचार केला. नागरिकांच्या भेटीगाठी, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर प्रमाणे प्रचाराची आघाडी घेतली. आमदार प्रणिती शिंदे यांच्या कॉर्नर बैठका तसेच भेटीगाटीला नागरिकांकडून उस्फुर्त प्रसिद्ध मिळत आहे