• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शहरवासीयांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी हवा कायद्याचा वाचक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 4, 2026
in इतर घडामोडी
0
शहरवासीयांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी हवा कायद्याचा वाचक
0
SHARES
2
VIEWS

सोलापुरात बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : प्रतिनिधीसोलापूर शहर-जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या हत्यांच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे.

शहरवासीयांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहणे आवश्यक आहे. याकरिता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबतचे निवेदन पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी स्वीकारले.गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गुन्हेगारीने अत्यंत उग्ररूप धारण केले आहे. अवघ्या तीन दिवसात तब्बल सहा जणांचे खून झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. सलग घडणाऱ्या हत्याकांडांमुळे संपूर्ण समाजात प्रचंड भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन मे रोजी माधव नगर परिसरात भर चौकात दिवसाढवळ्या झालेली हत्या आणि बोरामणी येथे घरात घुसून झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे सामान्य नागरिक, महिला आणि व्यापारी वर्गात मोठी दहशत पसरली आहे. भर दिवसा लोकांची वर्दळ असताना गुन्हेगार हत्यारे घेऊन रस्त्यावर दहशत माजवत आहेत आणि खून करत आहेत. यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा आणि कायद्याचा कसलाही वचक नाही हे स्पष्ट होते. जर सर्वसामान्य माणूस स्वतःच्या घरात आणि रस्त्यावरही सुरक्षित नसेल तर त्यांनी जगावे कसे ? समाजात असलेली ही असुरक्षिततेची आणि भीतीची भावना शहराच्या शांततेसाठी अत्यंत घातक आहे. समाजातील ही अस्वस्थता आणि भीती दूर करणे ही सध्या प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व हत्या प्रकरणांचा तपास तातडीने पूर्ण करून हे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यात यावेत. तसेच गुन्हेगारांना लवकरात लवकर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या.याप्रसंगी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, भाजपाचे सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.

पोलिसांची गस्त वाढवावी –

महापौर विनायक कोंड्याल गुन्हेगारांना कायद्याचा धाक रहावा याकरिता पोलीस प्रशासनाकडून सतत गस्त ठेवणे, त्यात वाढ करणे, शहरातील सर्वच भागात विशेषतः संवेदनशील परिसरात रात्रीची तसेच दिवसाची पोलीस गस्त वाढवावी. जेणेकरून नागरिकांच्या मनातील भीती कमी होईल. नागरिकांच्या मनातील भीती दूर करून त्यांना सुरक्षित वाटण्यासाठी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, असे महापौर विनायक कोंड्याल याप्रसंगी म्हणाले.

Previous Post

नरसापुर अत्याचारातील आरोपीला व्हावी कठोर शिक्षा: शहर भाजपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

TOP 25- महापालिकेचे बजेट होऊन दीड महिना झाले…अद्याप ठरावाची कॉपी आयुक्तांकडे नाही

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
TOP 25- महापालिकेचे बजेट होऊन दीड महिना झाले…अद्याप ठरावाची कॉपी आयुक्तांकडे नाही

TOP 25- महापालिकेचे बजेट होऊन दीड महिना झाले…अद्याप ठरावाची कॉपी आयुक्तांकडे नाही

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026