येस न्युज मराठी नेटवर्क : आमदार सुभाष देशमुख व युवानेते मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील चिंतामणी मंदिर, सैफुल येथे माता भगिनींसाठी मोफत नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
आज या शिबीरास युवानेते मनीष भैय्या देशमुख यांनी भेट दिली . दक्षिण पश्चिम मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्षा नीलिमाताई शितोळे यांनी या शिबीराचे आयोजन केले .
यावेळी शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, मंडळ अध्यक्ष आनंद बिराजदार, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा नीलिमाताई शितोळे, सुरेखाताई पडसलगी, सुपरवॉरिअर्स संदीप हेसे, अनुप्रीत शितोळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या .