फिक्कीकडून बालाजी अमाईन्स आणि त्यांची उप-कंपनी बालाजी स्पेशालिटीस पुरस्कार

0
418

येस न्युज मराठी नेटवर्क : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (FICCI) यांच्याकडून बालाजी अमाईन्सला विशेष रसायन या श्रेणीतील उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच त्यांचीच उप-कंपनी बालाजी स्पेशालिटीस ‘आत्मनिर्भर भारत’ या श्रेणीत उपविजेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दि. २५/११/२०२१ रोजी दिल्ली येथे हॉटेल लि मेरिडियनमध्ये शानदार सोहळ्यात वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्याकडून कंपनीचे अध्यक्ष ए. प्रताप रेड्डी यांनी दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

४५ हून अधिक देशांना आपल्या मालाचा पुरवठा करणाऱ्या बालाजी अमाईन्सने आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांमुळे जागतिक पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण केले असून साहजिकच सोलापूर आणि भारताचे नांव उज्वल केले.

यावेळी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक राम रेड्डी म्हणाले कि कंपनी निरंतरपणे संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करून काम करत असल्यामुळे विविध उत्पादने ज्यांची निर्माण प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि त्याचे तंत्रज्ञान फक्त विकसित देशांकडे उपलब्ध आहे, अशी उत्पादने व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान स्वतः विकसित केल्यामुळे आज विशेष रसायने निर्मित करण्यात कंपनीचे वर्चस्व आहे.

काही उत्पादने ही भारतात १००% आयात करण्यात येत होती परंतु बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटीमुळे त्या उत्पादनांची निर्मिती भारतात सुरु झाले असून आज ती उत्पादने बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी पर्यायाने भारत पूर्ण जगात निर्यात करत आहे आणि मोठ्या प्रमाणात भारताचे परकिय चलन बचत करण्यात आपले योगदान देत आहे.

मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना राम रेड्डी म्हणाले कि सुरुवातीपासूनच कंपनी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून स्वयंपूर्ण झाले आहे त्यामुळे काही रासायनिक उत्पादनांच्या बाबतीत आज भारत विदेशी बाजारपेठेवर अवलंबून नाही. हा पुरस्कार म्हणजे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या संघटात्मक केलेल्या उत्कृष्ट कामाची ही पावतीच आहे.