• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द

Yes News Marathi by Yes News Marathi
January 18, 2023
in मुख्य बातमी
0
राज ठाकरेंविरोधातील अटक वॉरंट रद्द
0
SHARES
0
VIEWS

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट परळी कोर्टाने अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट परळी कोर्टाने अखेर रद्द केलं आहे. यासोबतच त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. प्रत्यक्ष हजर राहिल्यानंतर त्यांनी आपल्याविरुद्धचं वॉरंट रद्द करण्याची विनंती केली. त्यानंतर कोर्टाने दंड ठोठावून त्यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द केलं आहे. अवघ्या पाच ते सात मिनिटांत ही प्रक्रिया पार पडली.

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्यासाठी राज ठाकरे परळीत दाखल झाले होते. परळी कोर्टात झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्याविरुद्धचं अटक वॉरंट रद्द झालं. तसंच त्यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे राज यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. 

नेमकं काय प्रकरण आहे?

राज ठाकरे यांना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्या अटकेचे पडसाद परळीतही उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर राज ठाकरे तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

अगोदर 3 जानेवारी आणि नंतर 12 जानेवारीला राज ठाकरेंना बीडमधील परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. पण, 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती. त्यानुसार, राज ठाकरे आज म्हणजे 18 जानेवारीला परळी कोर्टात हजर राहिले आहेत. आपल्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्याची विनंती राज यांच्याकडून न्यायालयाकडे विनंती करण्यात आली होती. राज यांची विनंती मान्य करत न्यायालयाने राज ठाकरे यांना पाचशे रुपयांचा दंड ठोठावून अटक वॉरंट रद्द केला. 

राज ठाकरेंसह मनसैनिकांवर गुन्हा 

या घटनेनंतर जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या कारणावरून मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करुन या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Previous Post

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल्स बस उलटली, २८ भाविक जखमी

Next Post

चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
Next Post
चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं

चीनमध्ये करोनाने पुन्हा डोकं वर काढलं

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026