• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2022
in मुख्य बातमी
0
भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

उन्हाळा आणि सिंचनासाठी राज्यातील विजेची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यातच कोळसा टंचाईमुळे अपुरी वीज निर्मिती होऊ लागली आहे. पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध होणारी वीजही महागडी ठरू लागली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विजेचे भारनियमन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग केंद्रीय विद्युत मंत्रालयाने ठरविल्याप्रमाणे वीज खरेदी करार करण्यासंदर्भात आवश्यक तो निर्णय महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या संचालक मंडळाला घेता येईल, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

वीजनिर्मिती प्रकल्पातून राज्यातील वीज निर्मिती आणि उपलब्धतेची परिस्थिती पुर्वपदावर येईपर्यंत काही काळाकरिता साधारणतः 15 जून 2022 पर्यंत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.

राज्यात सर्वसाधारणपणे एकून वीज वापराच्या 87 टक्के वीज महावितरणकडून वितरीत होते. मार्च 2022 पासून कृषी ग्राहकांकडूनही विजेचा वापर वाढला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळेही राज्याची उच्चतम मागणी 28 हजार 489 मेगावॅटपर्यंत पोहचली आहे. ही मागणी मागच्या वर्षाच्या तुलनेत 8.2 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या साडेतीन हजार ते चार हजार मेगावॅटचा तुटवडा भासत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी 1 हजार 900 मेगावॅटचा कोयना जल विद्युत प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालवण्यात येत आहे. परंतू यात पाणी वापरावर मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणला वीज खरेदी करार करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Previous Post

मनसेतून हकालपट्टीनंतर वसंत मोरेंच्या डोळ्यात अश्रू

Next Post

शिधापत्रिकाधारकांना वेळेत नियोजनबद्ध अन्नधान्याचा पुरवठा करावा – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Related Posts

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
मुख्य बातमी

पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

October 26, 2026
तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!
मुख्य बातमी

तुळजापुरात लाखो भाविक, आई राजा उदो उदो चा जयघोष…!

October 26, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!
मुख्य बातमी

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय
मुख्य बातमी

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026
Next Post
शिधापत्रिकाधारकांना वेळेत नियोजनबद्ध अन्नधान्याचा पुरवठा करावा – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

शिधापत्रिकाधारकांना वेळेत नियोजनबद्ध अन्नधान्याचा पुरवठा करावा - अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

पालकमंत्री म्हणाले,आता काँग्रेस विरोधात भाजप आंदोलन करणार…!

October 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सोलापूर जिल्ह्यातील 165 गावांना 178 टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 26, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026