सोलापूरचे अमोल उंबरजे यांना पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून जेष्ठ वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन अभ्यासक डॉ. इराक भरुचा यांच्या हस्ते ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत करण्यात आले.
मुळचे सोलापूरचे असलेले अमोल उंबरजे हे पुण्यातील प्रसिद्ध व्हीके ग्रुप संलग्नित सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धनातील भरीव कार्याबद्दल पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंदर अभियान अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून जेष्ठ वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन अभ्यासक डॉ. इराक भरुचा, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री माधव जगताप यांच्या हस्ते ‘पर्यावरण दूत’ म्हणून सन्मानीत करण्यात आले.
सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज (SI) हि संस्था शहरी आणि पर्यावरण नियोजन, आर्किटेक्चर, पर्यावरण, शाश्त्र, भूगोल आणि ऊर्जा या विविध क्षेत्रांतील समविचारी तज्ञांबरोबर १२ वर्षांपूर्वी सुरु केली होती. शाश्वत विकासाच्या सामायिक उत्कटतेने आणि शहरांमध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या आग्रहास्तव ह्या संस्थेतील विश्वस्थ एकत्र आले आहेत. पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रातील अर्थपूर्ण संशोधन विकसित करण्यात मदत करू शकणारे संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिकांचे मजबूत नेटवर्क तयार करण्याच्या उद्देशाने सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्जची संकल्पना करण्यात आली ज्याचा उपयोग शहर नियोजनासाठी केला जात आहे. ह्या कार्यात अमोल उंबरजे यांचे योगदान असते तसेच पुणे व सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरणीय कार्य चालू आहे. अनेक पर्यावरण व सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
सन्मानार्थी अमोल उंबरजे म्हणाले कि, व्हीके ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज चे विश्वस्थ पूर्वा केसकर, ह्रिषीकेश कुलकर्णी, अनघा परांजपे पुरोहित, अपूर्वा कुलकर्णी, विजय साने व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणीय व सामाजिक कार्य करत असतो. तसेच सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज च्या माध्यमातून दरवर्षी अनेक पर्यावरण व शाश्वत उपक्रमे राबविले जातात. निश्चितच ह्या सन्मानानंतर अजून माझी कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. पुढील काळात नागरिकांना व तज्ज्ञ मंडळींना एकत्रित आणून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा विचार आहे. तसेच हा सन्मान केल्याबद्दल पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिके आभार व्यक्त करतो.
पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या हॉल मध्ये पर्यावरण दूत सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, पूजा ढोले, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.