सांगली ( सुधीर गोखले) – जिल्ह्यात पाऊस सुरू असून सद्यस्थितीत पूर व आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, पाटबंधारे, सर्व प्रशासन व इतर सर्व विभाग सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी डॉ दयानिधी यांनी YES NEWS मराठी शी बोलताना आपले मत व्यक्त केले.
Home इतर घडामोडी संभाव्य पूर, आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये –...