राज्यातील बांधकाम कामगारांच्या मध्यान्न भोजनावर ठेकेदारानीच मारला ताव आणि दिली कोट्यवधीची ढेकर; जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी

0
26

सांगली ( सुधीर गोखले) – राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना राज्य शासनाने सुरु केली खरी पण बांधकाम कामगारांच्या मध्यान्न भोजनावर भोजन पुरवणाऱ्या ठेकेदारानेच चांगलाच ताव मारून कोट्यवधींची ढेकर दिल्याचा प्रकार उघडकीस येतोय. प्रत्यक्षात नोंदणीकृत असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण झाल्याचे समोर येतेय. ते या प्रकरणी नुकतेच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी चौकशीचे आदेश जरी दिले असले तरी ठेकेदार आता कोट्यवधींची ढेकर देऊन सुस्तावले आहेत. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे अनुक्रमे ६५ हजार नोंदणीकृत कामगार आहेत तर कोल्हापुरात लाखावून अधिक कामगारांनी नोंदणी केली आहे या कामगारांना माणगाव येथील सेंट्रल किचन मधून भोजन वितरित केले जाते.

या योजनेच्या सुरुवातीपासूनच कामगारांमधून जेवणा बाबतीत निकृष्ठ जेवणाच्या तक्रारी आहेत मध्यंतरीच्या काळात कित्तेक थाळ्या निकृष्ठ जेवणामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये टाकल्याचे निदर्शनास आले होते. ठेकेदाराला एका थाळीमागे ६२ रु ७० पैसे मिळतात त्यामुळे ठेकेदाराने हे जेवण वितरण असेच सुरु ठेवले ठेकेदारांवर कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक थाळ्या दाखवून अधिक बिले उकळल्याचा आरोप खुद्द सांगली सांगली जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता कामगारमंत्र्यांच्या गावातच भाजप ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या संदर्भात आंदोलनही करून मंत्री महोदयांना घरचा आहेर च दिला होता.
अत्यंत निकृष्ठ पद्धतीचे जेवण असल्याने लाखो कामगारांनी या मध्यान्न भोजन योजनेकडे पाठ फिरवली सध्या मात्र १७०० कामगारच या भोजन व्यवस्थेचा लाभ घेत आहेत.


माहिती अधिकारही कुचकामी
योजना सुरु झाल्यापासून आज पर्यंत किती थाळ्यांचे वितरण झाले आणि किती बिल ठेकेदारास अदा झाले याची आकडेवारी देण्यास कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे.