पोलीस पाटील पदांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत…

0
19

सोलापूर, दि.11,(जिमाका) : – सोलापूर क्रमांक 1 या उपविभागातील पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत मंगळववार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी दिली.

सोलापूर क्रमांक 1 या उपविभागात प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रीया राबवली जाणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे खेड, एकरुख, हगलुर, मोहितेवाडी, नंदूर. तरटगांव व समशापूर या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची आहेत.

तसेच बार्शी तालुक्यातील मौजे चिखर्डे, नारीवाडी, जहानपूर, ढेंबरेवाडी, महागांव, कळंबवाडी (आ), भोईजे, गोडसेवाडी, पानगांव, नागोबाचीवाडी, फपाळवाडी, लक्ष्याचीवाडी, सुर्डी, उंडेगांव, गाडेगांव, सौंदरे, अरणगांव, भोयरे, कांदलगांव, शेळगांव (मा.), बळेवाडी, तांबेवाडी, हिंगणी पा., भांडेगांव, मालेगांव, रऊळगांव, हिंगणी (आर), मिर्झनपूर, साकत, पिंपरी (आर), सर्जापूर, इर्लेवाडी, तडवळे या ठिकाणची रिक्त पोलीस पाटील पदे भरती प्रक्रियाव्दारे भरावयाची असुन, संबंधित गावातील इच्छुक उमेदवारांनी सदर आरक्षण सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करीता आवाहन उपविभागीय अधिकारी तथा पोलीस पाटील भरती समिती अध्यक्ष सदाशिव पडदुणे यांनी केले आहे.