सोलापुरातील महेश अंदेली यांचे निधन

0
44

येस न्युज मराठी नेटवर्क : महेश अंदेली यांनी आज दुपारी 1 वाजून 45 वाजता अखेरचा श्वास घेतला. महेश अंदेली यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्ष कार्य केले. सोलापूरच्या दैनिक तरुण भारत मध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. तरुण भारत मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली.

 गेली अनेक वर्षे ते प्रसार माध्यमात कार्यरत आहेत. जाहिरात क्षेत्राशी संबंधित संघटनेची स्थापना त्यांनी केली. या संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी होते. स्व. वि.गु. शिवदारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकारात काम सुरू केले. सोलापूर जनता सहकारी बँकेचे ते संचालक होते. मा. राजशेखर शिवदारे यांच्यासोबत सिद्धेश्वर सहकारी बँक , सोलापूर जिल्हा सहकारी ग्राहक भांडार या संस्थांमध्ये अनेक वर्षे कार्य करीत आहेत. जिल्हा ग्राहक भांडाराचे पंधरा वर्षे संचालक, व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या या संस्थेचे चेअरमन आहेत.

  अत्यंत प्रेमळ , सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वांचे मित्र अशी त्यांची ओळख आहे.