सोलापुरात तब्बल 93 लाखांची फसवणूक ,तिघा विरोधात गुन्हा दाखल

0
29

सोलापूर शहरातील 92 सभासदांची तब्बल 93 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तिघा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मनी सिक्रेट प्रायव्हेट लिमिटेड या नाशिकच्या कंपनीतील गणेश लोखंडे आणि गणेश भोसले या दोन एजंटानी कंपनीची माहिती स्वाती लालूप्रसाद मुत्याल यांना दिली.

स्वाती या गेंट्याल चौकातील वरदायिनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांचे पती मुंबईत कंपनीमध्ये कामाला आहेत. फिर्यादी स्वाती व फिर्यादीच्या पतीचे ओळखीचे असणारे पुष्पा विभूते यांच्या घरी कंपनीच्या एजंटांची पहिली भेट झाली. गणेश लोखंडे आणि भोसले या एजंटांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. तुम्हाला दर 45 दिवसांनी पंधरा टक्के व्याज देऊ असे आमिष दाखवण्यात आले. त्यामुळे स्वाती मुत्याल यांनी चार लाख दहा हजार रुपये गुंतविले त्यांना 92 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला. याची माऊथ पब्लिसिटी झाल्यामुळे उर्वरित 92 सभासदांनी देखील अशाच पद्धतीने सुमारे 93 लाख 94 हजार रुपये गुंतवले आणि यामध्ये या सर्वांचीच फसवणूक झाली.

या प्रकरणाबाबत स्वाती मुत्याल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक मध्ये राहणारे सचिन वरखडे, अमोल खोंड आणि अरविंद मेहता यांच्या विरोधात 420 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरात आजवर अनेक कंपन्यांनी टोप्या घातल्या तरीही सर्वसामान्य लोक ज्यादा व्याज दराला आणि खोट्या फसवणुकीला बळी पडतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे.