हादरा – इलेक्शन ड्युटीत हायगय 14 शिक्षक आणि 4 मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल

0
48

सोलापूर शहरात कार्यरत असणाऱ्या चौदा शिक्षकांवर आणि चार महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर उत्तर सोलापूरचे नायब तहसीलदार सुधाकर बंडगर यांनी निवडणूक कामात हायगय केल्याचा ठपका ठेवून गुन्हे दाखल केले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने 21 जुलै ते 21 सप्टेंबर दरम्यान मतदार यादी पुनर्नरीक्षणाचा कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये घरोघरी जाऊन मतदार यादीतील मयत व्यक्तींची नावे कमी करणे ,18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, स्थलांतरित झालेल्यांची माहिती गोळा करणे असे कामाचे स्वरूप होते मात्र वरील 14 शिक्षकांनी आणि चार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या कामात दिरंगाई केली असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्यामुळे 18 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .

कोणते आहेत हे 14 शिक्षक आणि चार कर्मचारी वाचा –

किरण जोशी, प्रमोदिनी खजूरकर दोघेही सेवा सदन प्रशाला, एस ए हंचाटे ,त्र्यंबकेश्वर विद्यालय, बी.टी गायकवाड एस आर चौधरी आणि जे एम कांबळे बालवाडी शिक्षिका महापालिका, आर एम म्हमाणे, सोनामाता आदर्श विद्यालय, ए.के आरगडे सिद्धेश्वर प्रशाला, संदीप पाटील संभाजीराव शिंदे प्रशाला, टी. एम. पवार शहा कोठारी प्रशाला, शारदा म्हस्के मुख्याध्यापिका त्र्यंबकेश्वर विद्यालय, युवराज मेटे कुचन प्रशाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच निवडणुकीच्या कामात हायगय केल्यामुळे गुन्हे दाखल झाल्याने शिक्षक वर्गात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. महापालिकेच्या मंडई विभागातील लिपिक एस डी शिंदे, आरोग्य विभागातील लिपिक एस जे मनियार, बी.सी पटणे ,आर एस अंकुश दोघेही महापालिकेतील लिपिक या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.