नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या घरकुल हस्तांतरणाच्या धर्तीवर रे नगर च्या आढावा व प्रगती पाहणी दौरा..

0
22

रे नगर च्या लाभार्थ्यांना हक्काच्या घरांसोबत आर्थिक स्थैर्य देऊ – संजीव जयस्वाल (उपाध्यक्ष म्हाडा )

सोलापूर दि. १८ :- ही वसाहत माझी आहे ही लोकभावना जनतेत येण्यासाठी त्यांना हक्काच्या घरांसोबत आर्थिक स्थैर्य दिले पाहिजे. केवळ घर दिल्याने त्यांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटणार नाहीत.त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा लागेल, बचत गट तयार करा, जेणे करून भविष्यात या रे नगर च्या घरकुल लाभार्थ्यांच्या आजच्या उत्पन्नाच्या प्रमाणात पुढच्या वर्षी दुप्पट उत्पन्न झाले पाहिजे. रे नगरच्या मूलभूत सुविधा व रस्ते बाबत मुख्य कार्यकारीअधिकारी व जिल्हाधिकारी आपण आपल्या स्तरावर प्रक्रिया पूर्ण करा शासन स्तरावर मी स्वतः पाठपुरावा करतो असे जाहीर हमी म्हाडा चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा.संजीव जयस्वाल यांनी दिली.

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या दारात घर नाही त्याला बेघराला घर देण्यासाठी सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून श्रमिकांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण नोव्हेंबर महिन्यात येणार आहे. रे नगर फेडरेशन मार्फत घर मिळवून देताना अत्यंत आनंद होत आहे. पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरे हस्तांतरित करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात दस्तुरखुद पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी येत आहेत. या सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी रे नगर फेडरेशन कटिबद्ध असून लाभार्थ्यांचे सर्व प्रक्रिया पूर्ण केलेले आहेत. रे नगर गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे थेट लक्ष असून दर तीन महिन्याला केंद्रीय व राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी, प्रत्यक्ष पाहणी, प्रगती आणि कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

याच अनुषंगाने शुक्रवार दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी म्हाडाचे उपाध्यक्ष मा. संजीव जयस्वाल यांनी रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाचे काम प्रगती पथावर असून प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी पायाभूत व मुलभूत सुविधा यामध्ये प्रामुख्याने २४ तास पाणी, मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते, सांडपाणी, पावसाळी गटार, ड्रेनेज, वीज, पथदिवे, शाळा, अंगणवाडी, वनीकरण, लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत वार्षिक दरसाल दरशेकडा ६.५ टक्के व्याज दराने कर्जाची उपलब्धता या प्रमुख अडचणी या सारख्या निगडीत अत्यंत महत्वाच्या विषयावर सर्व संबंधित खात्याचे सक्षम अधिकारी यांच्याशी आढावा घेऊन सदरचे काम युद्धपातळीवर पूर्ण होण्यासाठी येत असलेल्या समस्या व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना इत्यादी विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर रे नगर ची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता रे नगर च्या जागेवर जाऊन करण्यात आली.

यावेळी आशिया खंड आणि संबंध जगात श्रमिक कष्टकरी असंघटीत ३० हजार कामगारांचे ३०० एकर माळरानावर परवडणाऱ्या दरात आणि सर्वांसाठी घरे हि केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना सहकार तत्वावर रे नगर फेडरेशनच्या मार्फत ३० हजार घरकुलांची उभारणी केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान आणि लाभार्थ्यांचा हिस्सा अशा स्वरूपात करण्यात येत आहे. यासाठी पक्क्या घरकुलासोबत पायाभूत व मुलभूत सुविधा आदींची अनिवार्यता आहे. यासोबत घरकुलाची उभारणी होऊन प्रत्यक्ष वसाहतीत लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी लागणाऱ्या सुविधाही आवश्यकता आहे. या सगळ्या बाबी वेळोवेळी केंद्र व राज्य सरकार आणि गृहनिर्माण मंत्रालयासमोर अद्यावत माहितीची पूर्तता केल्यामुळे फेडरेशनवर विश्वास ठेवून प्रकल्पाची सत्यता पडताळून आजरोजी म्हाडाचे पदाधिकारी व सक्षम अधिकारी प्रकल्पाच्या पाहणीसाठी आलेले आहेत. प्रकल्पाच्या अडचणीची माहिती घेऊन त्यावर योग्य ती उपाय योजना करण्याची हमी रे नगर फेडरेशनला मिळालेली आहे. असे मत रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केले.

यावेळेस रे नगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर), मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता श्री.लहाने सोलापूरचे मा. उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, मुख्य अभियंता म्हाडा मुंबई मा. जाधव व मा. आडे, पुण्याचे मुख्य अधिकारी म्हाडा मा. अशोक पाटील, कार्यकारी अभियंता म्हाडा मा. वैभव केदारे, कार्यकारी अभियंता म्हाडा पुणे मा. मनीषा मोरे, रे नगर फेडरेशनचे चेअरमन कॉ. नलिनीताई कलबुर्गी, सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर), नगरसेविका कामिनिताई आडम, विकासक अंकुर पंधे, अभियंता मेहुल मुळे, कुर्मय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, रंगप्पा मरेड्डी, लक्ष्मण माळी, वीरेंद्र पद्मा, लक्ष्मण भंडारे, गजेंद्र दंडी
मा. सुनील ननवरे, मा. संदीप झाकणे, आशिष देवस्थळी,सनी शेट्टी, शाम आडम आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन बाळकृष्ण मल्याळ तर फेडरेशन चे चेअरमन कॉ.नलिनीताई कलबुर्गी यांनी आभार मानले.